Video : तोपर्यंत ते पडलेले असतील; पवारांचा माणूस म्हणणाऱ्या आंबेडकरांना जरांगेंचं खणखणीत प्रत्युत्तर
सोलापूर : मी कुणाचा माणूस हे कोडे उलगडूच शकत नाही, कारण हे कोडं उलगडेपर्यंत ते पडलेले असतील असं जोरदार प्रत्युत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) दिले आहे. मी फक्त मराठा समाजाचा आहे, माझा मालक फक्त मराठा समाज आहे. बाकी कुणाला गणतीत धरत नाही असेही जरांगेंनी स्पष्ट केले. ते सोलापूरमध्ये शांतता रॅलीत बोलत होते. यावेळी जरांगेंनी शरद पवार आणि भुजबळांवरही निशाणा साधला. (Manoj Jarange On Prakash Ambedkar In Solpur)
भुजबळ बोगस आरक्षण खाणाऱ्या समितीचा मुकादम; मनोज जरांगेंनी कोणालाही नाही सोडलं
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
आरक्षण बचाव यात्रेदरम्यान प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंच्या भूमिकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यात्रेदरम्यान एका ठिकाणी बोलताना आंबेडकर आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांसोबत सुरू असलेले भांडण हे नकली असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, त्यानंतर लगेच नांदेडमध्ये त्यांनी जरांगे शरद पवारांचा माणूस असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या दोन्ही विधानांचा जरांगेंनी समाचार घेतला.
मी कुणाचा हे कोडं त्यांना उलगडूचं शकणार नाही
प्रकाश आंबेडकरांच्या दोन्ही विधानांना जरांगेंनी सोलापूरच्या शांतता रॅलीतून प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, आंबेडकरांच्या दोन्ही विधानांवरून त्यांचं त्यांनाच मेळ लागेना मी कुणाचा माणूस आहे ते. मी कुणाचा हे कोडे त्यांना उलगडूच शकत नाही, कारण तोवर ते पडलेले असतील. मी फक्त मराठा समाजाचा आहे, माझा मालक फक्त मराठा समाज आहे. बाकी कुणाला गणतीत धरत नाही.
युक्रेन-रशिया युद्ध रोखलं, मग विनेशबाबत जे घडलं तेही रोखायला हवं; जयंत पाटलांचा मोदींवर निशाणा
भुजबळांना जो घेऊन येईल त्याला पाडायचे
यावेळी जरांगेंनी छगन भुजबळांवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, छगन भुजबळ आज काल दिसत नाही. छगन भुजबळला जो नेता ज्या मतदारसंघात घेऊन जाईल तो नेता पाडायचा. छगन भुजबळला जे घेऊन येतील त्या मतदारसंघात त्याला पडायचे. आता नावे घेवून कार्यक्रम लावयचा.
पावसातील सभेवरून पवारांवर निशाणा
सोलोपुरात रॅलीला संबोधताना जरांगेंनी शरद पवारांच्या पावसातील सभेवरून टीका केली. ते म्हणाले की, काही जण पावसात निवडून येण्यासाठी भिजतात. आपण जातीसाठी भिजू. विधानसभेला आपला माणूस देताना एकच माणूस द्या. समाज जो ठरवेल त्याच्या बाजूने उभे रहा. मराठ्यांनो फक्त एकोप्याने राहा असा सल्ला त्यांनी दिला. सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याचेही यावेळी जरांंगेंनी उपस्थितांना सांगितले.