Video: मी पाठीत वार करत नाही समोरूनच बोलतो; या कोण चर्चेला येतय, जरांगे पाटलांचं थेट आव्हान

  • Written By: Published:
Video: मी पाठीत वार करत नाही समोरूनच बोलतो; या कोण चर्चेला येतय, जरांगे पाटलांचं थेट आव्हान

Manoj Jarange Patil Press Conference : आमचे प्रश्न सोडवणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. आमचे हाल-हाल करून मारणं ही तुमची जबाबदारी नाही. सध्या तुम्ही म्हणता चर्चेला समोर या तर मी समोरच आहे. (Jarange Patil) तुम्ही न मागितलेलं १० टक्के आरक्षण देऊन आमच्या पाठित वार केला असा थेट घणाघात मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होत. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. यावेळी ते कोण चर्चेला येत या मी तयार आहे असं आव्हानही दिलं आहे.

भाजप नेते आणि खासदार अशोक चव्हाण मध्यस्थी करू इच्छित असल्याचं विचारल्यावर जरांगे पाटील म्हणाले आम्हाला प्रश्न सुटणं महत्वाचं वाटतं. त्यामुळे अशोक चव्हाण येऊद्या किंवा दुसरं कुणी. त्याबद्दल आमचा कधीच काही विरोध राहिलेला नाही. यावेळी देशमुख कुटुंबाबाबत अजित पवारांनी शिष्टमंडळाबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांना हे शोभत का ? असं म्हणज अजित पवार यांनाही जोरदार टोला लगावला.

खरी मजा आत्ताच;हिशोब चुकता करण्याची; मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर वार

स्व संतोष देशमुख कुटुंबाने या अमरण उपोषणात सहभागी होण्याची गरज नाही. ते दुःखात आहेत. मिच या बाकी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडा म्हणून सांगितलं आहे. माझ्या शरीराच वाटोळं झालं यांचं व्हायला नको त्यामुळे मी सर्वांना विनंती केली आहे की तुम्ही अमरण उपोषण करू नका असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी आपली हरकत नसेल तर जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे तुमची भेट घ्यायला तयार आहेत असं विचारलं असता, जरांगे पाटील म्हणाले आम्ही काय आतंकवादी आहोत का? आम्ही कुणाविषयी मनात द्वेष, राग ठेवत नाहीत. इथ सगळा देश येऊन गेलाय. त्यामुळ कुणी याव किंवा नाही त्यासाठी आम्ही कुणाला आडवलं नाही असंही ते म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube