मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, गाडीत बसताच अश्रू अनावर, म्हणाले, मला मारायचं तर…
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज (15 सप्टेंबर) मुंबईकडे रवाना झाले आहे. 29 ऑगस्टपासून
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज (15 सप्टेंबर) मुंबईकडे रवाना झाले आहे. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे अंतरवली सराटीत आंदोलन करत होते मात्र आता त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आज पाटील मुंबईकडे रवाना झाले आहे. तर दुसरीकडे आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना परवानगी नाकारली आहे. आतापर्यंत दोनदा पाटील यांना परवानगी नाकारण्यात आल्याने तिसऱ्यांदा देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून परवानगीसाठी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) अर्ज करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे आज सकाळी मुंबईकडे (Mumbai) निघताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) भावूक झाले. गाडीत बसताच त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, समाजाच्या लेकरांसाठी लढत राहणार आहे. सरकारला शरण जाणार नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी झाल्याशिवााय थांबणार नाही असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.
समाजाच्या लेकरांपेक्षा मला मोठे काय आहे. माझ्या समाजाचे लेकरं संकटात आहेत. त्यांच्या कल्याणासाठी मी जातोय. सरकारला वाटतंय मी त्यांना शरण यावे पण समाजाच्या लेकराला अर्धवट सोडून मी समाजाला धोका देऊ शकत नाही. मला ते मारुन टाकणार आहेत म्हणून मी आझाद मैदानावर जात आहे. मी माझ्या समाजाला त्रास होऊ देणार नाही मी लढून मरेल असं देखील यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.
वैभव सूर्यवंशीला संधी तर संजू बाहेर? दुसऱ्या टी20 साठी भारतीय संघात 3 बदल –
तर दुसरीकडे परवानगीवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवायचा आणि तीच परवानगी समाजायची. माझं सगळ्यांना आवाहन आहे की, शांत राहा. तुमच्या लेकरांसाठी मी लढेन. सरकारने मला चौकोनी घेरलं आहे. तुम्ही माझ्यासोबत राहा. मी जिवंत असो की नसो तुम्ही समाज मोठा करा. पक्षाला जीव लावू नका. समाजाला जीव लावा. मी मुंबईला जातोय. तुम्ही आशीवार्द घ्यायला या. मला मारायचं तर मारु द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.