Manoj Jarange : अजितदादा भुजबळांना समज द्या अन्यथा… अहमदनगरमधून जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange : अजितदादा भुजबळांना समज द्या अन्यथा… अहमदनगरमधून जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे (Manoj Jarange ) व मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. नुकतेच येवल्यामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेचे पोस्टर फाडण्यात आल्याचे समोर आले. यावर जरांगे म्हणाले, अजितदादा तुम्ही त्यांना समज द्या आम्हाला त्यांच्या विरोधात बोलायला पुढे लावू नका. ते जर असंच बोलत राहिले तर आम्हाला देखील शांततेचा मार्ग शोधावा लागेल असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता लगावला आहे.

Animal Trailer: ‘बापासाठी जग पेटवायला निघाला…’ रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल’चा ट्रेलर रिलीज

मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज जरंगे राज्यभर दौरे करत असून नुकताच ते आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. बाकीच्यांना आरक्षण दिले तेव्हा मराठ्यांनी कधीही विरोध केला नाही. तर मराठ्यांना आरक्षण द्यायचे म्हटले की विरोध सुरू होणार. ज्यांना मोठं केलं तेच आज मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विरोध करत असल्याची टीका यावेळी मनोज जरांगे यांनी केली.

भुजबळ यांना समज द्या…

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर भुजबळ यांनी विरोध दर्शविला आहे. यावरून मनोज जरांगे व मंत्री भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले असून नेवासाच्या सभेत मी थेट भुजबळ यांना इशारा दिला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, अजित पवार तुम्ही भुजबळांना समज द्या उगाच आमच्या नावाने खडे फोडू नका.

Team India : सलग दहा विजय, फायनलध्ये धडक; पडद्यामागचा ‘हिरो’ निवृत्तीच्या वाटेवर

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण देखील या विषयांमध्ये लक्ष घालावे भुजबळांना जाणीवपूर्वक जातीय दंगली घडवून आणण्याचे आहे. आम्ही मराठ्यांना शांततेचा आवाहन करत आहोत याने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बोर्ड पाडायला लावू नये मला देखील वेगळाच विचार करावा लागेल. याला वेळीच रोखा असा इशारा देखील जरांगे यांनी मंत्री भुजबळ यांचे नाव न घेता दिला आहे.

दरम्यान या अगोदर अहमदनगरमध्येच जरांगेंनी भुजबळांवर आरोप केले होते की, भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोधाची भुमिका घेतली आहे. त्यामागे राजकीय स्वार्थ आहे. कारण जर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळालं तर त्यांची राजकीय पोळी कशी भाजणार याची चिंता आहे. असा आरोप जरांगे यांनी यावेळी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube