Maratha Reservation : जाळपोळनंतर आता गाड्या फोडण्याचं सत्र; मुश्रीफांची गाडी फोडली!
Maratha Reservation : राज्यात सध्या >मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानासह गाड्यांवर हल्ले, जाळपोळ केल्याच्या घटना ताज्या असतानाच आता आणखी एका राजकीय नेत्याची गाडी फोडल्याचं समोर आलं आहे. मराठा आंदोलकांनी मुंबईतील आकाशवाणी निवासस्थानाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वैजापूरहून आलेल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आता व्हॉट्सअॅपवरही व्हिडिओ फॉरवर्ड अन् बॅकवर्ड करता येणार; लवकरच येतंय नवं फीचर
हसन मुश्रीफ यांची गाडी आमदार निवासस्थानाबाहेर लावण्यात आली होती. त्याचवेळी मराठा आंदोलक या ठिकाणी आले होते. त्यांनी मुश्रीफ यांच्या कारची तोडफोड सुरु केली. यावेळी काही आंदोलक व्हिडिओ काढत होत. याचदरम्यान, पोलिसांनी तत्काळ धाव घेत आंदोलकांना अडवलं. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलं असून यापैकी एकजण व्हिडिओ काढत होता. अजय साळुंखे, संतोष निकम, दिपक सहानखुरे अशी तिघांची नावे आहेत.
Maratha Reservation साठी अभिनेत्री मैदानात; आता नाही तर कधीच नाही, लढ्याचा भाग होणे माझे कर्तव्य
हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर आकाशवाणी निवास्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून मराठा आंदोलन चिघळत असल्याने पोलिसांकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. मंत्रालयातील शेजारीच असलेल्या आकाशवाणी निवासस्थानी मंत्र्याची गाडी फोडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Rahul Gandhi : …म्हणूनच विरोधकांचे फोन हॅक केले जाताय; राहुल गांधींचा भाजप आरोप
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले आहे. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केलीयं. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आले आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने जळाली आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले आहे. राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतर आंदोलकही दगडफेक करत आहे. तसेचही वाहने पेटवून देत आहेत.