Video : अजितदादांचा हवाला देत भारत-पाक सीमेवरून CM शिंदेंची भुजबळांना समज

  • Written By: Published:
Video : अजितदादांचा हवाला देत भारत-पाक सीमेवरून CM शिंदेंची भुजबळांना समज

श्रीनगर : मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता महायुतीतचं महाभारत सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. आरक्षणावरून छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) घेतलेल्या भूमिकेनंतर आता सत्तेतील नेत्यांमध्येच एकमत नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी (Shambhuraj Desai) भुजबळांवर कडक शब्दांत टीका करत अजितदादांनी वेळीच लक्ष घालत भुजबळांना आवरण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हवाला देत थेट भारत-पाक सीमेवरून भुजबळांना समज दिली आहे. ते जम्मू कश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरणप्रसंगी बोलत होते. (CM Eknath Shinde On Chagan Bhujbal Statement On Maratha & OBC Reservation)

Bihar Cast Survey : ‘फक्त 7 टक्के ‘ग्रॅज्यूएट’, 25 टक्के सवर्ण गरीब’; बिहारची आकडेवारी धक्कादायक

अजितदादांचा दिला हवाला

शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे भुजबळांनी म्हटले होते. मात्र, अशाप्रकारची कोणतीही बाब नसल्याचे शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा दोघेही उपस्थित होते. त्यावेळी ओबीसी समाज किंवा अन्य कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण दिलं जाईल हीच भूमिका राज्य सरकारची होती आणि आहे.

Chagan Bhujbal : कुणबी प्रमाणपत्र देणारे सत्तेतून जातील; भुजबळांच्या विधानाने खळबळ

त्यामुळे यात कुणीही ओबीसीसह इतर समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याची गरज नसल्याचे म्हणत भुजबळांना समज दिली आहे. आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असून, ओबीसी समाजावर अन्याय न करता त्यांना धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाचे काम होईल ही भूमिका सरकारची असल्याचेही यावेळी शिंदेंनी स्पष्ट केले.

शिंदेंसमोर उद्या मांडणार भूमिका – देसाई

एकीकडे भुजबळांच्या विधानामुळे सत्ताधाऱ्यांध्येच जुंपल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी कडक शब्दांत भुजबळांवर निशाणा साधला. यावेळी उपस्थित झालेल्या या मुद्द्यावरून आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी याबाबत चर्चा करणाार असल्याचेही यावेळी देसाईंनी स्पष्ट केले.  आरक्षणासंदर्भातील प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी योग्य प्रकारे हाताळल्याचंही देसाई यावेळी म्हणाले. भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून, कुणबी प्रमाणपत्राबाबत नियमावली ठरवण्यात आली आहे. त्यानंतरही जर अशा प्रकारची विधानं करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात असेल तर, परिस्थिती सुधरण्याऐवजी बिघडू शकते. त्यामुळे याबाबत  आम्ही उद्या (दि.8) आमची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर मांडणार असल्याचे देसाई यांनी सांगितलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube