खोक्या भाईला दणका! बुलडोझर लावून घरच केलं जमीनदोस्त; कारणही धक्कादायक

Beed News : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा खोक्या भाई उर्फ सतीश भोसले याला आणखी एक दणका बसला आहे. खोक्या भाईच्या घरावर थेट बुलडोझरच चालवण्यात आला आहे. वनविभागाने ही मोठी कारवाई केली आहे. सतीश भोसलेने वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधल्याचा दावा वनविभागाने केला आहे. सतीश भोसले फरार झाला होता. यानंतर त्याला शोधण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न केले जात होते. प्रयागराजमध्ये खोक्या लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली.
शिरुरकासार तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण करताना सतीश भोसले याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. तर आता 6 दिवसांनंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला प्रयागराजमधून उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी अटक केली.
ब्रेकिंग! बीडमध्ये पोहोचण्याआधीच ‘खोक्या’ला मोठा धक्का, सतीश भोसलेच्या तडीपार कारवाईला सुरूवात
दरम्यान, वनविभागाने या अतिक्रमणाबाबत खोक्याला नोटीसही बजावली होती. यानंतर वनविभागाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. शिरुर पोलिसांच्या मदतीने बुलडोझर लावून खोक्याचं घर पाडण्यात आले आहे. बीडमधील शिरुरकासार पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खोक्या भाईवर चार गुन्हे देखील दाखल आहेत.