LLB–BALLB प्रथम वर्षाची परीक्षा पुढं ढकला; दोन विषयांमध्ये एक दिवस सुट्टी, ‘SFI’ ची मागणी

परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी परीक्षा विभागाचे संचालक डॉ. बाबासाहेब डोळे यांना एसएफआय द्वारा निवेदन देण्यात आले.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 19T164113.933

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत (Education) घेण्यात येणाऱ्या नोव्हेंबर/डिसेंबर २०२५-२६ च्या LLB व BALLB प्रथम वर्ष, प्रथम सत्र परीक्षांचे वेळापत्रक आक्षेपार्ह ठरलं. त्यावर विद्यार्थी व संघटनांकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. या परीक्षा २४ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार असल्याची विद्यापीठाची घोषणा झाली असताना, नुकतेच विधी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी परीक्षा विभागाचे संचालक डॉ. बाबासाहेब डोळे यांना एसएफआय द्वारा निवेदन देण्यात आले. CET सेलच्या वेळखाऊ CAP राऊंडमुळे प्रथम वर्षाच्या नियमित तासिका सुरू होण्यास मोठा विलंब झाला. त्यामुळे आजअखेर BALLB आणि LLB प्रथम वर्ष, प्रथम सत्राचा अभ्यासक्रम अर्धवट स्थितीत असून उर्वरित भाग अद्याप शिकवला गेलेला नाही. UGC च्या नियमांनुसार किमान ९० दिवसांचा सेमिस्टर पूर्ण शिकविल्याशिवाय परीक्षा घेणे उचित नाही, असं एसएफआयचं म्हणणं आहे.

मराठवाड्याला अतिवृष्टीचा चटका! विद्यापीठाच्या विद्या परिषदेने महाविद्यालयातील शुल्कवाढीचा प्रस्ताव फेटाळला

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी अर्धवट अभ्यासक्रमासह परीक्षेला सामोरे जाणे मानसिकदृष्ट्या अत्यंत अवघड असून विद्यापीठाने याची गांभीर्याने दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने केली आहे. BALLB प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या परीक्षा १९ डिसेंबर २०२५ पासून व LLB प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या परीक्षा १८ डिसेंबर २०२५ पासून घेण्यात येणार्यां परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात व दोन पेपरमध्ये किमान एक दिवसाचा गॅप देण्याचीही मागणी केली आहे.

एक दिवसाचा गॅप दिल्याने  विद्यार्थ्यांना आवश्यक तासिका व अभ्यासाची पूर्तता करता येईल. अशा मागण्यांचे निवेदन परीक्षा विभाग संचालकांना देण्यात आले. या प्रसंगी एसएफआय जिल्हा अध्यक्ष मनिषा बल्लाळ, संकेत चव्हाण, अरुण मते,विक्रम पवार, सुकन्या तांदळे,पंजाब जगताप,रोहन गजहंस व विद्यार्थी उपस्थित होते.

follow us