कुंटणखाना चालवणाऱ्या ठाकरे गटाच्या ‘त्या’ जिल्हाप्रमुखाला पदावरुन हटवलं!

कुंटणखाना चालवणाऱ्या ठाकरे गटाच्या ‘त्या’ जिल्हाप्रमुखाला पदावरुन हटवलं!

Beed Crime : बीड जिल्ह्याच्या केज पोलिसांनी एका कुंटनखाण्यावर छापा टाकून त्यामध्ये 4 अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली आहे. या घटमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे केजमधील कुंटणखाण्यावर केलेल्या कारवाईत ठाकरे गटाचे (shivsena thackeray group)जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे(ratnakar shinde) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमधील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिंदे यांचा हात यामध्ये असल्याचे समजताच त्यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे.(Beed crime shivsena thackeray group district head ratnakar shinde kej police prostitution action)

PHOTO : या अभिनेत्री पडल्या विदेशींच्या प्रेमात, काहींनी गुपचूप लग्न केले तर काहींनी घर सोडले

केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालणाऱ्या एका कलाकेंद्रावर शुक्रवारी अडीच वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी वेगवेगळ्या चार खोल्यांमध्ये काही अल्पवयीन मुली, महिला पुरुषांसमोर नृत्य करताना दिसून आल्या.

आढळराव शरद पवारांचे दार ठोठावतायत पण मी असताना…; कोल्हेंचा मोठा दावा

पोलिसांच्या चौकशीदरम्यान काही मुलींना विचारणा केल्यानंतर अनेकांकडे ओळखपत्रही नव्हते. तर यामधील एका अल्पवयीन मुलीने तीला पैशाचे आमिष दाखवून नृत्य करण्यास लावत असल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली. तसेच 16 पुरुषांनाही ताब्यात घेण्यात आले.

विशेष म्हणजे पहाटेच्या सुमारास झालेल्या कारवाईमध्ये रात्री 9 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणी अधिकृतरित्या काय कारवाई होणार याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यामध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून शिंदे यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. शिंदे यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube