जाळपोळ करणारे जरांगेंचेच गुंड, एवढी मस्ती कुठून आली तुला?, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

  • Written By: Published:
जाळपोळ करणारे जरांगेंचेच गुंड, एवढी मस्ती कुठून आली तुला?, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, या मागणीवर ठाम आहेत. मात्र, ओबीसी नेत्यांनी त्यांच्या मागणीला जोरदार विरोध केला. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह अनेक ओबीसी नेते जरांगेंच्या विरोधात उतरले आहेत. आजही बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलतांना भुजबळांनी जरांगेवर जोरदार निशाणा साधला.

ओबीसी मेळाव्यात भाषण थांबवत महादेव जानकरांनी धरले भुजबळांचे पाय, म्हणाले, ‘तुम्हाला मुख्यमंत्री….’ 

या सभेला संबोधित करतांना भुजबळ म्हणाले, कोड नंबर देऊन बीडमध्ये जाळपोळ करण्यात आली. विचारपूर्वक प्लॅनिंग करून जाळपोळ झाली. मला कळत नाही, बीडमध्ये मराठा आरक्षण जाळपोळ प्रकरणातील आरोपींना विनामुल्य जामीन मिळवून दिल्याबद्दल वकील संतोष संतोष घोलप यांच्या टीमची दखल घेऊन सत्कार करण्यात आला. का रे बाबा? लोकांची घरे जाळली, बायका-मुले मेली, अशा लोकांना जामीन द्यायला ते उभे राहिले, ठीक आहेत, ते त्याचं प्रोफेशन असेल. पण, तुम्हाला त्यांचा सत्कार करण्याचं कारण काय? मी पहिल्यापासून सांगतोय यामागे जरांगे आहे. त्यामुळंच तो सांगतो की, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. जामीन मिळाल्यावर त्यांचे सत्कार करायला जातो, याचा अर्थ एकच आहे, हे सर्व त्याचेच गुंड होते, असं भुजबळ म्हणाले.

Sunny Leone करणार नव्या इंडस्ट्रीत प्रवेश; सांगितला ‘चिका लोका’ च्या ग्रॅंड ओपनिंगचा किस्सा 

आता तीन कोटी मराठा समाजाला मुंबईत घेऊन जाणार सांगतात. मात्र ते फक्त फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये झोपणार. दोन-चार मिटींगा घेणार, अशी टीका भुजबळांनी केली.

एवढी मस्ती कुठून आली ?
अजित पवांरांवर जरांगेंनी टीका केली होती. त्यावरूनही भुजबळांनी जरांगेंना चांगलचं सुनावलं. अजित पवार इतकचं म्हणाले की, कायदा पाळा. त्यांच्यावर किती घाणेरड्या शब्दात टीका केली. बघा काय बोलले, युट्यूबवर अजूनही आहे. काही सुसंस्कृतपणा? तोंड दिलंय देवाने म्हणून काहीही बोलणार, एवढी मस्ती कुठून आली तुला, अशा शब्दात भुजबळांनी हल्लाबोल केला.

आमचं आरक्षण घेणार असला तर….
यावेळी भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधातील भूमिकेचा पुनरुच्चार केला. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. मराठा समाजाला विरोध नाही, पण आमचं आरक्षण घेणार असला तर आम्ही त्याच्याविरोधातच जाणार असं भुजबळ म्हणाले.

ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये, ही सरकारची जबाबदारी आहे.. आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण राज्यघटनेने दिलेले अधिकार आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मेल्या आईचं दूध प्यायलो नाही. मराठा समाजाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हे सर्व थांबवा. ओबीसीतून आरक्षण घेणं चुकीचे आहे, जाळपोळ करणे चुकीचे आहे, हे तुम्ही त्यांना सांगा. ठराविक तारखेपर्यंत आरक्षणाची बालिश मागमी करणं हे चूक आहे. सरकारला वेठीस धरणं चुक आहे, असं भुजबळ म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube