छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्यांवरुन सभागृहात घमासान; कंत्राटदार थेट काळ्या यादीत

छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्यांवरुन सभागृहात घमासान; कंत्राटदार थेट काळ्या यादीत

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)राजमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामं कंत्राटदार (Contractor)सक्षम नसल्यामुळं गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्याकडं आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं आहे. त्यावर वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (Black List)टाकणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे.

संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शरणापूर ते साजापूर-करोडीपर्यंत असलेल्या 6 किलोमीटर रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये तीनवेळा निधी उपलब्ध दिला. मात्र तरीही रस्त्याचं काम अपूर्ण राहिलं.

तुमच्या सारखी शेतकऱ्यांच्या तोंडाला…; सभागृहात CM शिंदे भडकले

या रस्त्याच्या 28 कोटी रुपयांच्या कामासाठी 7 डिसेंबर 2022 पर्यंत निविदा मागवल्या. चार कंत्राटदारांकडून निविदा प्राप्त झाल्या तरी निविदा उघडल्या नाहीत. त्यामुळं आतापर्यंत या रस्त्याच्या कामासाठी किती वेळा निधी उपलब्ध करून दिला? किती खर्च झाला? अखर्चित किती राहिला? तसेच संबंधित कंत्राटदारानं सक्षम नसल्याचं सांगत काम थांबवलं.

त्यामुळं त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. राजकीय वर्चस्वामुळं याला विलंब होत असल्याचा आरोप दानवेंनी केला. न उघडलेल्या निविदांवर चर्चा करण्यात यावी व चौकशी करावी अशी मागणीही दानवेंनी केली.

तसेच संबंधित विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर व कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी मागणीही दानवे यांनी केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील राज्य उत्पादन विभागाच्या इमारत व विश्रामगृहासाठी 10 कोटींची निविदा मागविण्यात आली. असं असतानाही 10 महिन्यांपासून निविदा उघडली नाही. त्याकडं दानवेंनी सभागृहाचं लक्ष वेधलं.

काही ठराविक कंत्राटदार क्षमता नसतानाही कंत्राट घेऊन काम पूर्ण करत नाही.त्यांची क्षमता तपासणीसाठी यंत्रणा उभारणं आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सर्व निविदांची माहिती दर्शविणारी सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली जाणार आहे. असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. फेब्रुवारी 2024 च्या आधी विश्रामगृहाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण केलं जाईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube