तुमच्या सारखी शेतकऱ्यांच्या तोंडाला…; सभागृहात CM शिंदे भडकले
Eknath Shinde : अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान आणि राज्य सरकार उचलतं असलेली पावलं यावरून कालपासून विधानसभेत विरोधक आणि सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. सरकारने अद्यपपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केलेली नाही. यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) चांगलेच भडकले. कांदा खरेदी अद्याप सुरू झालेली नाही असा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केला. या प्रश्नाला शिंदे उत्तर देताना विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी भुजबळांनी शेतकऱ्यांना कधी दिलासा देणार, असा प्रतिप्रश्न केला यानंतर शिंदे चांगलेच भडकले.
वाचा : ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक; फडणवीसांकडून शिंदेंना बळ
शिंदे म्हणाले की, नाफेडकडून काही ठिकाणी कांदा खरेदी गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेली आहे. याशिवाय कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आमचं सरकार करत आहे. यावर तुम्ही कधी दिलासा देणार असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. त्यावरून शिंदे चांगलेच भडकले.
Sushma Andhare : एकनाथ शिंदे फक्त कळसुत्री बाहुली, फडणवीस खरे सूत्रधार
‘अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मागे हे सरकार खंबीरपणे उभे असून, जसे पंचनामे पूर्ण होतील त्यानंतर त्वरित मदत दिली जाईल,’ तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे मदत करणार आहोत, अशी ग्वाही शिंदेंनी सभागृहात गदारोळ सुरू असतानाच दिली.
‘आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 12 हजार कोटी रुपये दिल्याचे सांगत तुमच्या सारखी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केलेली नाही’ असे सांगितले. याशिवाय नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देतो असे सांगितले असा प्रतिप्रश्न शिंदेंनी भुजबळांना विचारला हे पैसे आम्ही दिल्याचे ते म्हणाले. तुमच्या सारखं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सध्याचं सरकार करत नसल्याचे ते म्हणाले.