काल शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा अन् आज भाजपमध्ये प्रवेश, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का

छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे. अनेक कार्यकर्ते रोज भाजपमध्ये जात आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 23T132659.123

राज्यात महानगर पालिकांचा रणसंग्राम आजपासून सुरू झाला आहे. (Election) आजपासून अर्ज भरण्याला सुरूवात झाली आहे. अस असतााच शिवसेना ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला धक्का बसला आहे. पक्षाचे महानगर प्रमुख रेणुकादास (राजू) वैद्य यांनी पक्ष पदाचा राजीनामा देत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे. आतापर्यंत आठ माजी महापौरांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. बारा ते पंधरा माजी नगरसेवकांनी देखील पक्ष त्याग करीत शिवसेनेत प्रवेश केला. पदाधिकारी – कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.

पुणे-संभाजीनगर फक्त 2 तासात पार होणार; नितीन गडकरींकडून मोठी घोषणा

काल सोमवारी (२२ डिसेंबर) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख रेणुकादास (राजू) वैद्य यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे पत्र पाठवून आपण पदाचा राजीनामा देत आहे असं कळवलं होतं. राजीनामा देण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मी कॉलेजच्या जिवनापासून हिंदुत्वासाठी काम करतो. हे काम करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटात अडचण होत होती. आता भाजपमध्ये आल्याने ती अडचण दूर होईल. गेली दोन वर्षापासून अतुल सावे आमच्या पक्षात या असं म्हणत होते तो योग आज आला आहे. आता पक्ष जी जबाबदारी देईल त्या जबाबदारीत राहून मी पक्षासाठी आणि हिंदुत्वासाठी काम करेल असं राजू वैद्य आपल्या पक्ष प्रवेशानंतर म्हणाले.

follow us