छत्रपती संभाजीनगरच्या ‘त्या’ घटनेवर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…
राज्यात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही काही दिवसांपूर्वीच मुलींच्या छेडछाडीची घटना घडली. त्यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असून टवाळखोरांवर चाप बसणार कारण राज्य सरकारची नीती आणि नियत स्पष्ट असल्याचं वाघ यांनी ठणकावून सांगितलं आहे.
काहींनी ओढणी ओढली तर काहींनी स्कार्फ; संभाजीनगरमध्ये तरुणीसोबत किळसवाणा प्रकार
वाघ म्हणाल्या, छत्रपती संभाजीनगरमधे काही टवाळखोरांनी दुपारची वेळ साधून कॅालेजहून परतणाऱ्या तरूणीला भररस्त्यात अडवून तिचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
शहरात वर्दळीचा रस्ता असतानाही आसपासची सर्व माणसं फक्त बघ्यांच्या भूमिकेत होती हे देखील धक्कादायकच आहे. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी सतर्कता दाखवत तात्काळ कारवाई केली.
या घटनेनंतर एका तरूणाला ताब्यात घेतलं इतर सर्व आरोपी ही पकडले जातीलचं आणि भविष्यात अशा घटना घडणारच नाही अशा पद्धतीने या हिंसक प्रवृत्तींना चाप लावला जाणार असल्याचं वाघ यांनी स्पष्ट केलं आहे.
राहुल गांधी भगवा हातात घ्या, मग आम्ही काँग्रेसचेच; गुलाबरावांच्या वक्तव्याने खळबळ !
यावेळी संभाजीनगरमध्ये टवाळखोरांवर चाप बसण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, अशा घटनांमध्ये महिलांच्या पाठिशी उभं राहण्याची जेवढी सरकारची जबाबदारी आहे तेवढीच सुजाण नागरिकांची असल्याचं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं आहे.