सरकार पलटवलं अन् राज्य नंबर वन केलं; अजितदादांसमोरच शिंदेंकडून ठाकरे सरकारचा पंचनामा

सरकार पलटवलं अन् राज्य नंबर वन केलं; अजितदादांसमोरच शिंदेंकडून ठाकरे सरकारचा पंचनामा

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अनेक मंत्री छत्रपती संभाजीनगर येथे होते. शासकीय कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली.

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबत विचारले. त्यावर शिंदे म्हणाले, घोषणा केल्याशिवाय निधीची तरतूद होते का?  तुम्ही तर अडीच वर्षात घोषणा सुद्धा केल्या नाहीत. आम्ही ज्या घोषणा केल्या आहेत त्या विचारपूर्वक केलेल्या आहेत. यावर अधिकाऱ्यांनी काम केलेले आहे. यासाठी लागणारा प्रत्येक पैसा शासनाकडून दिला जाणार आहे. आम्ही काम करणारे आहोत मागील एक वर्षातलं आमचं कामकाज एकदा पाहून घ्या. यांना साध्या घोषणाही करता येत नाहीत यांनी काय आमच्यावर टीका करायची? मंत्रालयात जे गेले नाहीत ते काय घोषणा करणार? असा खोचक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.

विधानसभेत सरडे बसलेत, ठाकरे गटाच्या खासदाराकडून नार्वेकरांवर हल्लाबोल

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र मागे गेला असे तुम्ही म्हणाला होतात त्यावर विरोधी पक्षांचे नेते म्हणाले की त्या सरकारमध्ये तुम्ही सुद्धा मंत्री होतात असे पत्रकारांनी विचारल्यावर शिंदे म्हणाले होतो ना. मी मंत्री होतो, अजितदादा सुद्धा होते. पण आम्ही काही मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही अनेक योजना घेऊन जायचो पण, त्यासाठी इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे आणि आपल्या सहकाऱ्यांनी सांगिलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणारा पाहिजे तेव्हा राज्य पुढं जातं. आम्ही सरकार पलटवलं नसतं तर राज्य अजून किती मागं गेलं असतं. परदेशी गुंतवणुकीत गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलं आम्ही तिघं आल्यानंतर परत महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर आणलं त्यानंतर शिंदे यांना थांबवत अजितदादा म्हणाले तुम्ही सगळे पत्रकार तुम्ही जरी काही ठरवलं तरी जोपर्यंत तुमचा बॉस काही ठरवत नाही तोपर्यंत तुमचं काही चालत नाही. तसं मंत्रिमंडळात आम्ही काम करत असलो तरी प्रमुख म्हणून मुख्यमंत्री जोपर्यंत ठरवत नाहीत तोपर्यंत पान हलत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube