मागच्या सरकारमध्ये निर्णयच होत नव्हते; एकनाथ शिंदे यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला

  • Written By: Last Updated:
मागच्या सरकारमध्ये निर्णयच होत नव्हते; एकनाथ शिंदे यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला

औरंगाबाद : मागच्या सरकारमध्ये निर्णयच होत नव्हते पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून उद्योगासाठी आम्ही चांगले निर्णय घ्यायला सुरु केलं आहे. असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केले आहे.

ते आज औरंगाबाद मध्ये ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ च्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. पायाभूत सुविधा निर्माण करणे, कर्ज उपलब्ध करून देणे, परवानगी आणि परवाने याची प्रक्रिया सोपे करणे हे काम आमचे सरकार करत असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं.

ते पुढे म्हणाले कि राज्य सरकारकडून समृद्धी महामार्गासारखे मोठे प्रकल्प राज्यात चालू केले आहेत. महाराष्ट्र हे पायाभूत सुविधा देण्यात कायमच अव्वल राहिले आहे. येत्या काळात आणखी काही प्रकल्प राज्यात सुरु होतील. अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

येत्या काळात राज्य सरकार उद्योगासाठी विशेष काम करेल, तसेच दावोस मध्येही मोठे करार होतील. त्यामुळे उद्योगासाठी राज्य सरकार कायमच मदत करेल. असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube