जालन्यात दलित तरुणाला क्रूर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न; शिंदेंकडून आरोपींवर कडक कारवाईचा आदेश

Eknath Shinde on Kailas borade photographs shown by Chhagan Bhujbal : राज्यामध्ये क्रूर पद्धतीने हत्येच्या घटना घडत असताना नुकतीच जालन्यामध्ये एका दलित तरुण कैलास बोराडे ला क्रूर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला. याचे काही काळजाचा थरकाप करणारे फोटो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात दाखवले. त्यानंतर हे फोटो पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर मोठी घोषणा केली. संबंधित पिडीताशी संपर्क साधला आहे. तसेच त्यांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा केली जाईल असं सांगितलं आहे.
त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी या पिडीताचे फोटो दाखवले. ते मी बघितलं. त्यामुळे मी धावत इकडे आलो. बोराडे सोबत झालेला प्रकार अत्यंत अमानुष आहे. त्यामुळे मी जालन्यातील एसपी यांना या संदर्भात आदेश दिले आहे की, यावर ३०७ नाही. तर थेट मकोकाची कारवाई करा.
खंडणीसाठी मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली का? CM फडणवीस म्हणाले, ‘हे काम अतिशय…’
या तरुणाला गरम सळईने चटके देत मारत असल्याचे अनेकांनी व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ व्हायरल केले गेले. दरम्यान या तरुणाशी मी संपर्क साधला आहे. तो घाटी या सरकारी दवाखान्यात दाखल होता. मात्र मी त्याला तात्काळ जिल्हा प्रमुखांना सांगून खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या सर्व उपचारांचा खर्च आम्ही करू असं आश्वासन मी त्याला दिले.
त्याचबरोबर त्याची मागणी जी आहे. ती गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. तर त्यातील एकाला अटक देखील करण्यात आले आहे. शासनाने तो विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे या संघटित गुन्हेगारीवर मकोकाची कारवाई करण्यात येणार आहे. असं अश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.