मराठवाड्याची लेक करणार वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य, कल्पना धनावतला मिळाला पहिला मान
Jalna-mumbia Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 डिसेंबर रोजी जालना ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे (Vande Bharat Express) उद्घाटन करणार आहेत. या एक्सप्रेससाठी लोको पायलट म्हणून फुलंब्रीच्या लेकीला मान मिळाला आहे. फुलंब्री तालुक्यातील पाल गावची रहिवाशी असलेल्या 27 वर्षीय कल्पना धनावतला (Kalpana Dhanwat) हा मान मिळाला. या हायस्पीड ट्रेनचे सारथ्य कल्पना करणार असल्याने पालवासीयांनी आनंद व्यक्त केला.
रामलल्लांसोबत चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली : पंतप्रधान मोदी
वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनासाठी केंद्र सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करणार आहेत. मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसची सहायक लोको पायलट म्हणून कल्पना धनावतला मान मिळाला. कल्पना आज जालन्याहून मुंबईकडे धावणाऱ्या या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेससाटी सहाय्यक लोको पायलट म्हणून काम पाहणार आहे.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी मोदींचे चहापान, कोण आहे पंतप्रधानांना चहा देणारी महिला
कल्पना ही मुळची पाल येथील रहिवासी असून तिचे वडील मदनसिंह छत्रपती हे संभाजी नगर येथील एसटी महामंडळात कार्यरत होते. ते आता निवृत्त झाले आहेत. त्यांची मुलगी कल्पना हिने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर परीक्षेद्वारे २०१९ मध्ये कल्पनाची रेल्वे विभागात लोको पायलट पदासाठी निवड झाली. आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ती लोको पायलट म्हणून सध्या काम करत आहे.
दरम्यान, जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेची गुरुवारी जालना ते मनमाड अशी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत कल्पनाने सहाय्यक लोको पायलट म्हणून काम पाहिले. आता आज धावणाऱ्या पहिल्या जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य कल्पना करणार आहे.
कल्पनाच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या य़शाबद्दल आनंद व्यक्त करतांना सांगितले की, कल्पना लहानपणापासूनच अत्यंत हुशार आहे. तिने शालेय जीवन असो की महाविद्यालयीन, दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी केली. कल्पना ९५ टक्के गुणांसह दहावीत पहिली आली होती. जिद्द, चिकाटीच्या जोरावर तिने रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण केली. आज ती आपल्या विभागातून धावणाऱ्या पहिल्या महत्वकांक्षी व अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य करणार आहे, याचा अभिमाना वाटतो, असं ते म्हणाले.