शरद पवारांसाठी टोपेंची बीडमध्ये फिल्डिंग; भरसभेतच बीडकरांना सांगितलं मोठं काम

शरद पवारांसाठी टोपेंची बीडमध्ये फिल्डिंग; भरसभेतच बीडकरांना सांगितलं मोठं काम

Rajesh Tope : ‘पवार साहेबांनी नेहमीच तत्वाचं राजकारण केलं. आजही ते येथे तुम्हाला सहकार्य मागण्यासाठी आले आहेत. वयाच्या 83 व्या वर्षातही ते संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना आधार देणे गरजेचे आहे. कितीही वादळं आले तरी त्याला साहेब कधी घाबरले नाहीत. म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. त्यांना आधार देण्याची गरज आहे. तो आधार तुम्ही सगळ्यांनी द्या’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी बीडवासियांना केले.

बीड शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आ. संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

मलिकांचं ठरलं तर! अजितदादांना धक्का देत शरद पवारांना दिलं बळ; म्हणाले, मी कुठेही…

‘सध्याच्या सरकारला एक म्हण तंतोतंत लागू पडत आहे. ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात.. लबाडाघरचं आवतान जेवल्याशिवाय खरं नाही’ या सरकारने दिलेलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही. पावसामुळे नुकसान झालं अनुदान मिळालं का?, विमा मिळाला का?, वाळू साडेसहाशेला मिळते का? मिळणारच नाही त्याचं कारण आजही वाळूचा बेकायदेशीर उपसा सुरू असून वाळू आठ हजारांना विकली जात आहे’,

‘केंद्र आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देऊ असे सांगितले होते. पण सरकार अपयशी ठरले. दुर्दैवाने आज पाऊस नाही. मराठवाडा पावसाची वाट पाहतोय. पाण्याचं आवर्तनही येथे मिळत नाही, अशी येथील परिस्थिती आहे. आता आपल्याला आपल्याला टी 20 मॅच खेळावी लागणार आहे. बूथ कमिट्या तयार कराव्या लागतील. सर्वांना बरोबर घेऊन काम करावे लागणार आहे’, असेही टोपे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून… : फडणवीसांचा इशारा

बीडमध्येच होणार अजित पवार गटाची उत्तरसभा

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आजची सभा घेत अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्लॅन नक्की केला आहे. मात्र, या राजकीय डावाला उत्तर देण्याचा खास प्लॅन अजित पवार गटानेही केला आहे. शरद पवारांनीही भाजपसोबत यावे यासाठी अजित पवार गटाने प्रयत्न केले. पण, शरद पवार आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता अजितदादा गटाने शरद पवारांना उत्तरसभांतून आव्हान देण्याचा निश्चय केला आहे. अजित पवार गटाची पहिलीच सभा बीड जिल्ह्यातच होणार आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा पहिला सामना बीडमध्ये रंगणार आहे. ही उत्तरसभा 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सभेसाठी अजित पवार गटाने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube