सरकारला सोडणार नाहीच! सगेसोयऱ्यांच्या कायद्यासाठी शनिवारपासून उपोषण; जरांगेंची घोषणा
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) केलेल्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली. त्यानंतर आता राज्यात सुमारे 54 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपही (Maratha Reservation) झाले आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या कुटुंबियांनी अर्ज करावेत. सगेसोयऱ्यांसंदर्भात सरकारने कायदा तयार करण्यासाठी तातडीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी येत्या 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार आहोत, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
Manoj Jarange : तो टर्निंग पॉईंट नाही तर आंदोलनावरील डाग; आंतरवालीतील लाठीचार्जवर जरांगे संतापले
जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या आंदोलनाची माहिती दिली. तसेच मोर्चातून काहीच साध्य झाले नाही अशी टीका करणाऱ्यांचाही समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, काही जण स्वतःला अभ्यासक आणि समाजाचे नेते म्हणून मिरवून घेत आहेत. आंदोलनाला काही जण विरोध करत आहेत. परंतु, मागासवर्ग आयोग स्थापन झाला हे या आंदोलनाचे यश नाही का, असा सवाल त्यांनी केला. मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी डाव रचला जात असून यात विरोधक आणि सत्ताधारी दोघेही सहभागी आहेत. या आंदोलनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांचा हात असल्याचे सांगितले गेले परंतु या आंदोलनात फक्त आणि फक्त मराठा समाजाचा हात आहे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
उपोषणाआधी राज्यात दौरे
दरम्यान, उपोषण सुरू करण्याआधी मनोज जरांगे पाटील राज्याच्या विविध भागात दौरे करणार आहेत. आज जरांगे पाटील आळंदीत येणार आहेत. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई, चेंबूर, 8 तारखेला नाशिक, 9 फेब्रुवारी रोजी गेवराई तालुक्यातील मांजरसुंबा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी पुन्हा आंतरवाली सराटीत येऊन बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
मनोज जरांगे अन् आरक्षणाच्या वादापासून चार हात लांबच रहा : अजितदादांच्या आमदार अन् मंत्र्यांना सूचना