राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! मराठवाडा अन् विदर्भात धो धो कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Unseasonal Weather Alert : राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. काही शहरात (Maharashtra Weather) तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. अशी परिस्थिती असताना अवकाळी पावसाचं संकटाचाही (Unseasonal Rain) इशारा मिळाला आहे. पुढील तीन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भासह अन्य ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
आज पहाटे राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रायगड, पनवेल, यवतमाळ या ठिकाणी पाऊस झाला. आज राज्यात अनेक जिल्ह्यांत सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे. त्यामुळे दिवसभरात पावसाची शक्यता दिसत आहे. हवामानात अचानक झालेल्या या बदलाने उष्णता काहीशी कमी झाली आहे. मात्र जर पाऊस झाला तर शेतातील पिकांना नुकसानकारक ठरणार आहे.
सावधान! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांतील 96 जिल्ह्यांत येणार उष्णतेच्या लाटा; हवामानाचा विभागाचा इशारा
पुण्यासह राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव,नांदेड जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यांत पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राने हा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस होईल. त्यामुळे या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. एकूणच राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर सूर्य तापणार, विदर्भात अवकाळीचं संकट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील जनता सध्या हवामानातील चढ उताराचा अनुभव घेत आहे. मार्च महिन्यात रणरणतं ऊन होतं. पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला. सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला पण शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. हा अंदाजही खरा ठरला. या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे.