‘त्या’ एकट्याचं ऐकून आमच्यावर अन्याय करू नका, अन्यथा…; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

  • Written By: Published:
‘त्या’ एकट्याचं ऐकून आमच्यावर अन्याय करू नका, अन्यथा…; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Manoj Jarange : अंतरवली सराटीतील मराठा समाजाचं (Maratha Reservation) आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळं दगडफेकही झाली होती. दरम्यान, आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असं आश्वासन देऊनही गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. त्यामुळं मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) अनेकदा सरकारवर टीकास्त्र डागलं होतं. आता त्यांनी याच मुद्द्यावरून फडणवीसांवर भाष्य केलं. फडणवीसांनी गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं, त्यांनी मागं फिरू नये, त्या एकट्याचं ऐकूण आमच्यावर अन्याय करू नये, अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा इशारा दिला.

‘शांतता ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा’; बच्चू कडूंचं मोठं विधान 

आज माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलले ते बरोबर आहे. कारण ते खोटे बोलत नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनीही खोटं बोलू नये. अंतरवली सराटीत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांचे मंत्रीही आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी सांगितलं होतं की, अंतरवली सराटीतील तुमच्या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊ. तसेच महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेऊ. त्यामुळे फडणवीस यांनी मागे फिरू नये. त्यांनी खरं बोलावं. त्या एकट्याचं ऐकूण (छगन भुजबळ) आमच्यावर अन्याय करू नाही. अन्यथा नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावं लागेल, असं थेट इशारा जरांगेंनी दिला.

Gautami Patil : ‘मला आरक्षण हवंय’; मराठा आरक्षणावर गौतमी पाटील बोलली… 

राज्य मागासवर्गाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यात कोणत्याही बाधा य़ेऊ नये, असं काम राज्य मागासवर्ग आयोगाने करावे. त्यावर राज्य मागासवर्ग आयोगाने जातीलं लक्ष द्यावे. या अगोदरच्या आयोगावर वेगवेगळे जातीचे वेगवेगळे लोक होते, त्यावर आम्ही कधी प्रश्न उपस्थित केले का? समितीचा अध्यक्ष हा ओबीसी असला तर ओबीसीचा आयग असतो असं असंत का ? आयोगाचा अध्यक्ष हा कुठं गरीब जनतेला न्याय देण्यासाठी कायद्याने बसवलेला आहे. न्यायाची प्रक्रिया भूमिका पार पडत असतात त्याला जात नसते, असं जरांगे म्हणाले.

जरांगे म्हणाले, या आयोगावर आता कोण आलं हे मला माहीत नाही, पण आयोग यामध्ये जाती का आणावं हे मला कळत नाही. हे सर्व खालच्या दर्जाचे विचार आहेत. कशातही जात बघतात हा रोग चांगला नाही, असं जरांगे म्हणाले.

नितेश राणेंवर दबाव
फडणवीसांवर टीका केल्यानं भाजप आमदार नितेश राणेंनी जरांगेंना गाठ मराठ्यांशी आहे, असा इशारा दिला होता. राणेंनी
इतर नेत्यांना गावबंदी आणि रोहित पवारांच्या यात्रेला परवानगी दिली जाते, असा आरोपही केला होता. त्यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, उपोषण सुटले त्यावेळेसच बंदी उठवलेली आहे. त्यांच्यावर न बोललेलं बरं. त्यांना या अगोदर दोन-तीन वेळेस सांगितलं आहे की, समाजासाठी तुमचं काम मोठं आहे. पण समाजापेक्षा पक्ष मोठा मानायचा म्हणल्यावर असं बोलावंच लागणार आहे. शेवटी त्यांच्यावर दबाव आहे. त्यामुळे ते मराठ्यांच्या विषयी काहीही बोलत असतील. शंभर टक्के त्यांच्यावर दबाव आहे. आमची विनंती आहे की, मराठ्यांच्या लेकरांच्या विरोधात बोलू नये… त्यांना आरक्षण मिळू द्यावं, असं जरांगे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube