मराठ्यांसाठी तू कलंक, अंतरवालीत ये नाहीतर नको येऊ; मनोज जरांगे पुन्हा विखेंवर संतापले

Manoj Jarange Patil-. तुम्ही सपशेल अपयशी ठरला आणि तुम्ही मराठ्यांशी दगाफटका केलाय, गोड बोलून. एक वर्षे हे तुम्ही मान्य करा.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Manoj Jarange

Manoj Jarange Patil and Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे अकराव्या दिवशी उपोषण सुरू आहे. परंतु आता सरकार आणि जरांगे यांच्यामधील चर्चा होण्यापूर्वी संघर्ष चिघळला आहे. कारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जरांगे यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी सर्व पर्याय संपले आहेत, असे म्हटले आहे. त्यावरून मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदत पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री राधाकृष्ण विखेंवर जोरदार टीका केली आहे. तू मराठा समाजाचे वाटोळे केले आहे. तू मराठ्यांसाठी कलंक आहे. अंतरवलीत ये नाहीतर नको येऊ, तुला कोणी बोलविले आहे, अशी एकेरी भाषा जरांगे यांनी विखेंसाठी वापरली आहे.

दहीहंडी केली तर एन्काउंटर करू; पोलिसांवर दमबाजीचा आमदार संग्राम जगतापांचा गंभीर आरोप

मनोज जरांगे म्हणाले, विखे पाटील म्हणाले सरकारसमोरील पर्याय संपले आहेत. पण कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे, बावनकुळेंच्या पाठीशी उभे राहणे, मराठ्यांचे वाटोळे करणे हेच पर्याय तुमच्याकडे होते का ? याच्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष झाला आहात का ? तुम्ही वैयक्तिक मंत्रिपदावर असताना तुम्हाला कुणी काही बोलणार नाही. तुमच्याकडे जोपर्यंत मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळचा शिक्का आहे, तोपर्यंत तुम्हाला मराठ्यांचे कामे करावे लागणार आहे. तुम्ही सपशेल अपयशी ठरला आणि तुम्ही मराठ्यांशी दगाफटका केलाय, गोड बोलून. एक वर्षे हे तुम्ही मान्य करा. तुमच्यामुळे मराठ्यांचे वाटोळे झाले आहे. तू अंतरवलीत ये किंवा नको येऊ, तुला बोलवित पण नाही. मुंबईत बोलविले नव्हते. आम्हाला वाटले एक मराठा मोठा लीडर आहे. समाजाचे कल्याण करेल वाटलं. अर्ध्या पुरात नेऊन मराठा समाजाला सोडून माघारी फिरला आहे. सरकारला समजून घ्यायला सरकार काय आमचा बाप आहे का ? असा संतप्त सवाल जरांगे यांनी केलाय.

तुम्हाला जातीला समजून घेता येत नाही. एक काम होत नाही, मान्य करा सगळ्या जास्त उपसमितीचे जे अध्यक्ष झाले आहेत. त्यात सगळ्यात जास्त निष्क्रिय आणि मराठ्यांचे वाटोळे करणारे कोणी असेल तर विखे आहेत. काहीच करता आलेले नाही. आता अंग काढून घेतोय. लावा-लावा करून मोकळा झाला आहे. तुला उपसमितीचा अध्यक्ष व्हायचे आहे. बोलल्यावर तुला राग पण येतोय. त्याचा राग रॅलीत राग घेणार आहे, फडणवीसांना विचारून. तुमच्या दोघांचे षडयंत्र ठरलेले आहे, रॅलीत हल्ला करायचा. तुम्हाला उभे राहिला जागा राहते का बघा तुम्हाला. तू अंतरवली ये नाहीतर नको येऊ, जा म्हणा तिकडे ?

Sujay Vikhe Patil : डीएसपी चौकातील वाहतूक कोंडीला मिळणार दिलासा; उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

मराठ्यांना कळतंय, सातारा संस्थानचे गॅझेटियर महिनाभरात देतो, असं म्हणाला. 58 लाख नोंदीचे यादी देतो म्हणाले. तू काय दिले आहे. तू वाटोळे केले आहे. तू अर्ध्यात मराठ्यांचे वाटोळे केले आहे. प्रत्येक वेळेस फडणवीसांना गुणगान गायचे आहे. शरद पवारांनी मराठ्यांना काही दिले नाही, एेवढेच तुणतुणे तू वाजविले आहे, असा टोलाही जरांगे यांनी विखेंना लगावला आहे.



जरांगेंचे समाधान होत नसेल तर आमचा पर्याय नाही-विखे

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला जे जे निर्णय घेता येणे शक्य होते, तेवढे निर्णय घेतले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन त्यांनाही अवगत केले. तरीही जरांगे पाटील यांचे समाधान होत नसेल तर आमचा पर्याय नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेले आहेत. त्याला जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे.

follow us