Maratha Reservation : जरांगेंचं उपोषण आणखी तीव्र; मुख्यमंत्र्यांच्या सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यात आता जरांगे यांनी पाणी सोडलं आहे. तर त्यांनी सलाईन देखील काढून टाकले आहे. तर दुसरीकडे या आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यात यावर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maratha Reservation साठी आणखी एक बळी; भाषण करून घरी येताच मराठा समन्वयकाचा मृत्यू
मुख्यमंत्र्यांच्या सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघणार?
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये राज्यातील सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीसाठी विरोधी पक्षातील शरद पवार गटाकडून राजेश टोपे, ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maratha Reservation साठी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बंदची हाक; भाजपचाही पाठिंबा
मुख्यंमंत्र्यांच्या ठाण्यात बंदची हाक!
मराठा आरक्षण आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्या निषेधार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा समाजाच्या या बंदला ठाण्यात उस्पुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपखाडी या भागमध्ये सर्व दुकानं बंद ठेवत व्यापाऱ्यांनी देखील या बंदला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान प्रवाश्यांची अडचण होऊ नये म्हणून वाहतूक मात्र काही प्रमाणात सुरू आहे. दरम्यान मराठी आंदोलकांना रिक्षा चालकांना बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.