Maratha Reservation : गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही; जरांगे पाटीलही ‘आरपार’च्या भूमिकेत
Maratha Reservation : राज्यात आरक्षणाची लढाई तीव्र होऊ लागली आहे. मराठा समाजाकडून आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला देण्यात आलेली डेडलाईन संपली असल्याने जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले की, टिकणाऱ्या आरक्षणबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही. असं म्हणत जरांगे हे आक्रमक झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, मुंबईतील आंदोलनाची सविस्तर माहिती उद्या देणार आहे. तसेच टिकणाऱ्या आरक्षणबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही. महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
Manoj Jarange : तर मराठ्यांवर अन्यायच! हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंनी फेटाळला
मराठे मुंग्यांसारखे घराबाहेर पडतील
जरांगे पाटील पुढे म्हणाले, भविष्यात मुलांचे हाल होणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी घर सोडा. सरकर त्यांचे काम करते आहे आम्ही आमचे काम करतो आहे. सरकार त्यांचे काम करते आहे आम्ही आमचे काम करत आहोत. मराठा आणि कुणबी एकच आहेत. आता आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. तेव्हा आता घराबाहेर पडा आणि मुंबईकडे चला असे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले. सरकार आरक्षण देणार नाही त्यामुळे आम्ही मुंबईकडे जाणार आहोत. ५० टक्क्यांच्या वर दिले तर ते टिकणारे असेल का? असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आमचा लढा आहे. गरीब धनगरांना न्याय देण्यासाठी शेंडगेंनी शक्ती वापरावी. मुंबईला जाण्यााठी मराठे मुग्यांसारखे घराबाहेर निघतील असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
आरक्षण द्या, मुंबईला येण्याची आम्हालाही हौस नाही
सरकारने आरक्षण दिलं तर आम्हालाही मुंबईला जाण्याची हौस नाही. पण एकदा का समाज मुंबईला गेला तर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. वेळप्रसंगी जीव पणाला लावू पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. 20 जानेवारीच्या आत जर सरकारने आरक्षण दिलं तर आम्हाला मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही. आता सरकारने दिलेला शब्द पाळावा अन्यथा आम्हाला मुंबईला येण्याशिवाय पर्याय नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम, सरकारला आतापर्यंत भरपूर वेळ दिला