धनंजय मुंडेंचे मंत्रिपद धोक्यात! मराठा बांधवांची फडणवीसांकडे मागणी, म्हणाले, ‘…तोपर्यंत मंत्रिपद देऊ नका’
Santosh Deshmukh News : काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणामुळं बीडसह संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. आता देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणात आता धनंजय मुंडेंचे समर्थक वाल्मिक कराड (Valmik Karad) यांचे नाव समोर आले.
‘स्थगिती देऊन चालणार नाही, कारवाईचा आदेश रद्द करा; महाआरती केल्यानंतर आदित्य ठाकरेंची मागणी
अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
घेऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील मुख्य आरोपीला आरोपीला लवकरात लवकर अटक व त्यांना कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. तसे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच जोपर्यंत मुख्य आरोपी वाल्मिक कराड जेरबंद होत नाही तोपर्यंत बीड जिल्हयातील या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांना कोणत्याही प्रकारचे मंत्रीपदाची नियुक्ती करु नये, अशीही मराठा बांधवांनी मागणी केली.
मराठा बांधवांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, बीड जिल्हयातील मस्साजोग येथील सरपंच कै. संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या ही समस्त मानवजातीसाठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासवणारी व लाजवणारी बाब आहे. समाज माध्यमावरुन व्हायरल झालेल्या कै. संतोष देशमुख यांना झालेली मारहाणीचे छायाचित्रे पाहून अंतःकरणाला पिळवून टाकणारी आहे. एखाद्या रानटी हिंसक श्वापदांनी मिळून एखाद्या भक्षाला ठार मारावे अशा प्रकारे झालेली ही निर्घृण हत्या जनसामन्यांच्या भावनांना संतप्त करणारी आहे.
… तर आज मी अभिनेत्री नसते, ‘बंदिश बँडिट्स’ फेम श्रेया चौधरीने केला खुलासा
प्रशासनाची भिती उरली नाही…
पुढं लिहिलं की, विविध वृत्तपत्रे व माध्यमातून वाचलेल्या बातम्या व पोलीस स्टेशनचा एफ.आय.आर वाचून एवढेच लक्षात येते की, नरधमांनी केवळ खंडणीस विरोध केल्याने एका प्रामाणिक सरपंचाचा बळी घेतला आहे. ‘हम करे सो कायदा’ या प्रमाणे सदर नरधमांनी न्यायालयातून जामीन मिळाल्याच्या दोन दिवसानंतर केलेली कृत्ये हे केवळ कायदा व प्रशासनाची कोणतीही भिती न उरल्याचे प्रतिक आहे.
तोपर्यंत मंत्रिपदे देऊ नका…
केवळ त्यांच्या अशा काळया कृत्यांना कोणाचाही विरोध होवू नये म्हणून समाजात दहशत निर्माण करण्यासाठी केलेला हा षंढ प्रकार आहे. अशा या कृत्यांचा शतशः जाहीर धिक्कार करीत आहोत. नरधमांनी केलेल्या कृत्याची स्वतंत्र तपास यंत्रणाद्वारे तपास करुन प्रकरण चालविण्यासाठी सरकारी वकीलांची नेमणूक करावी. तसेच या प्रकरणांचा जोपर्यंत मुख्य आरोपी वाल्मिक कराड जेरबंद होत नाही तोपर्यंत बीड जिल्हयातील या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांना कोणत्याही प्रकारचे मंत्रीपदाची नियुक्ती करु नये व हे प्रकरण जलदगतीने कार्यवाही होण्यासाठी जलद न्यायालयात केस दाखल करुन न्याय देण्यात यावा, ही विनंती.