गेवराईत आमदार विजयसिंह पंडित यांना धक्का, गीता त्रिंबक बाळराजे पवार नगराध्यक्ष म्हणून
राज्याच्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागत असून काही ठिकाणी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
भाजपने अंबाजोगाईत खाते उघडले आहे. तर भाजपचे नंदकिशोर मुंदडा विजयी झाले आहेत. गेवराई बीड आणि धारूर मध्ये भाजपा आघाडीवर आहे. तर परळीत मुंडे भाऊ बहिणीची जादू कायम आहे. महायुती 5000 मतांनी आघाडीवर आहे. तर माजलगावात अजित पवार आणि शरद पवार गटात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
एका मताने विजयी
राज्याच्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागत असून, पुण्यात एक जबरदस्त निकाल पाहायला मिळाला आहे. पुण्यातून पहिला निकाल आज लागला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे फक्त एका मताने उमेदवार विजयी झाला आहे. वडगाव नगरपंचायतीत हा निकाल लागला आहे. सुनीता राहुल ढोरे एक मताने विजयी झाल्या आहेत.
वडगावमधील प्रभाग क्रमांक 4 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव होता. भाजपाने येथून पूजा अतिश ढोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनीता राहुल ढोरे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. सुनीता ढोरे यांना एकमा मताने ही निवडणूक जिंकली आहे. वडगावमध्ये नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 45 असे एकूण 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. येथून भाजपाला एका तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा प्रभागात बंडखोरीचा सामना करावा लागत आहेत. नऊ प्रभागांमध्ये दोन उमेदवारांमध्ये थेट सामना आहे. तर पाच प्रभागात तिरंगी आणि चौरंगी लढत होत आहे. एका प्रभागात राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये लढत आहे.
