Chatrapati Sambhajinagar : नामांतराच्या मुद्द्यावरुन खासदार जलील यांनी कोणालाही सोडलं नाही…
संभाजीनगर : माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत असल्याचं खोचक विधान छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. खासदार जलील नवी मुंबईत एमआयएमच्या राष्ट्रीय संम्मेलनात बोलत होते. दरम्यान, खासदार जलील यांच्या खोचक विधानानंतर राज्यात कलगीतुरा रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खासदार जलील म्हणाले, माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत आहेत. देवेंद्र म्हणतात मी केलंय, एकनाथ शिंदे म्हणतात मी केलंय आणि ज्यांचे नाव आणि निशाणी सर्व गेले ते देखील म्हणतात की मी केलंय, या शब्दांत त्यांनी विरोधकांना नामांतरणाच्या मुद्द्यावरुन धारेवर धरलंय.
Live : कसबा, चिंचवड पोटनिवडणूक: एक वाजेपर्यंत संथगतीने मतदान
तसेच औरंगाबाद हे आमचे शहर आहे, होते आणि राहील. आता औरंगाबादसाठी आम्ही रस्त्यावर उतरू. जोरदार शक्तीप्रदर्शन करू. आमच्या लाडक्या शहरासाठी भव्य मोर्चा काढू. आमच्या शहराच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या शक्तींचा पराभव करण्यासाठी औरंगाबादवासियांनो सज्ज व्हा, नामांतराचा आम्ही निषेध करतो आणि लढणार असल्याचा इशारा त्यांनी ट्विटद्वारे दिला होता.
Ranjit Singh Naik Nimbalkar:पहाटेच्या शपथविधीत अजित पवारांचा नाहक बळी गेला
दरम्यान, ठाण्यातील मुंब्रा येथे एमआयएमचे राष्ट्रीय सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. या संम्मेलनात खासदार जलील नामांतर मुद्द्यावरुन चांगलेच तापल्याचं पाहायला मिळाले आहेत. दोन मिनिटात कशी टी-20 खेळली जाते, हे मी असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत राहून शिकलो आहे. त्यामुळे मी औरंगाबादचा खासदार आहे औरंगाबादचाच राहणार असल्याचं थेट आव्हान विरोधकांना दिलंय.
…म्हणून कसब्याची निवडणूकच रद्द करावी! उमेदवाराने केली निवडणूक आयोगाकडे मागणी
मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याची मागणी लावून धरली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधी औरंगाबादच्या नामांतरास मंजुरी दिली होती.
त्यानंतर शिंदे-फडणीस सरकारकडून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. नूकतीच केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे.
या नामंतराला एमआयएमकडून कडाडून विरोध करण्यात आला असून त्याविरोधात रस्त्यावर उतरुन आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. नामांतर मुद्द्यावरुन औरंगाबादेत पुन्हा एकदा हिंदु-मुस्लिम वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.