VIDEO : उद्धव ठाकरेंपाठोपाठ गडकरींचीही तपासणी; व्हिडिओ होतोय व्हायरल..
Nitin Gadkari Chopper Checked : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या (Maharashtra Elections) सभांचा धुराळा उडतोय. महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या सभांना गर्दीही होत आहे. स्टार प्रचारक थेट हेलिकॉप्टरनेच सभा स्थळी दाखल होत आहेत. पण, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकारी कर्मचाऱ्यांकडून प्रचारकांच्या बॅगांची तपासणी होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) बॅगची दोन वेळा तपासणी करण्यात आली. या तपासणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून मोठा गदारोळ उडाला होता. आता असाच प्रकार केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या बाबतीत घडला आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवारी सभा घेण्यासाठी आले असताना नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली.
ECI officials check Union Minister Nitin Gadkari’s belongings.
No drama or intimidation by his team unlike other leaders. pic.twitter.com/qjoGEBRvWB
— Information & Updates (@satish_vlog) November 12, 2024
लातूर जिल्ह्यातील (Latur News) औसा येथे महायुती उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी आले होते. याच दरम्यान निवडणूक आयोगाचे एक पथक तेथे पोहोचले आणि या पथकातील अधिकाऱ्यांनी गडकरींचे हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी केली.
याआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची दोन वेळा तपासणी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. तपासणी करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत करून उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता.
दर वेळेस मीच पहिला गिऱ्हाईक का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगांची अशीच तपासणी केली होती का? पीएम मोदी आणि अमित शहा यांच्या बॅगाही तपासल्या होत्या का? अशी प्रश्नांची सरबत्ती उद्धव ठाकरे यांनी केली होती. यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
Video : दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का?; ठाकरेंची पुन्हा झाडाझडती