…तब्बल सहा तास बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरुप सुटका !

  • Written By: Published:
…तब्बल सहा तास बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरुप सुटका !

Parbhani News : आजीसोबत शेतात गेलेला चार वर्षांचा चिमुरडा उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. तब्बल सहा तास चाललेल्या बचाव कार्याला यश आले. बोअरवेलमध्ये पडलेला चिमुरड्याला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर बचाव कार्यातील पथकासह ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला. तर त्याचे कुटुंबियाला आनंदाला पारावार उरला नाही.
( parbhani child stuck in the borewell for more than six hours is finally released)
परभणीतील मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथे ही घटना घडली. सोहम सुरेश उक्कलकर (वय 4) असे मुलाचे नाव आहे. बुधवारी सकाळी सोहम हा आपल्या आजीसोबत शेतात गेला होता. आजी खुरपणीचे काम करत होती. त्याचवेळी तो खेळत खेळत बोअरवेल जवळ गेला. त्याच्या हातातील बाहुली बोअरवेलजवळ पडली. ती बाहुली घेत असताना सोहम हा बोअरवेलमध्ये पडला.

पंतप्रधानांनी अर्ध सत्य सांगितले; खडसेंकडून मोदींची पोलखोल

परंतु शेतात काम करत असणाऱ्या आजी व इतर लोकांच्या लक्षात तत्काळ हा प्रकार आला. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणाही लवकर मदतीला आली. महसूल, पोलिस, अग्निशामक दल, वैद्यकीय अधिकारी ही घटनास्थळी आले होते. तर नांदेड येथील एनडीआरएफचे पथक ही दाखल झाले होते. सोहमसाठी बोअरवेलमध्ये ऑक्सिजन सोडण्यात आला होता. बोअरवेलमधून सोहमला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत येत होते.

पृथ्वी शॉने 129 चेंडूत ठोकले द्विशतक; रोहित शर्मापासून एक पाऊल दूर

तर पर्यायी उपाय म्हणून जेसीबीने बोअरवेलच्या बाजूने खोदण्यात येत होते. बचाव पथकाने बोअरवेलमध्ये दोरीचा फास सोडला होता. त्या फासामध्ये सोहम अडकला. त्यानंतर दोरी हळूवारपणे बाहेर काढण्यात आली. त्यात सोहम हा सुरक्षीतपणे बाहेर आला. सोहमला वाचविण्यासाठी सर्व यंत्रणा तब्बल सहा तास लागले. सोहम सुरक्षित बाहेर आल्यानंतर बचाव पथकासह ग्रामस्थांनी जल्लोष केला. सोहमची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube