पृथ्वी शॉने 129 चेंडूत ठोकले द्विशतक; रोहित शर्मापासून एक पाऊल दूर

पृथ्वी शॉने 129 चेंडूत ठोकले द्विशतक; रोहित शर्मापासून एक पाऊल दूर

Prithvi Shaw : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने इंग्लंडच्या नॉर्थहॅम्प्टनमधील काउंटी ग्राउंडवर शानदार द्विशतक ठोकले आहे. नॉर्थम्प्टनशायरसाठी तिसऱ्या सामन्यात सलामी येताना पृथ्वी शॉने 81 चेंडूंमध्ये (14 चौकार, 2 षटकार) शतक झळकावले. पृथ्वी शॉने 129 व्या चेंडूवर द्विशतक पूर्ण केले. त्याने आपल्या द्विशतकात 24 चौकार आणि 8 षटकार ठोकले. पृथ्वी शॉने लिस्ट ए क्रिकेटमध्येही विक्रमांचा पाऊस पाडला आहे.

पृथ्वी शॉने मागील द्विशतक 2020-21 विजय हजारे ट्रॉफीमध्ये केले होते. त्यावेळी त्याने पुद्दुचेरीविरुद्ध मुंबईसाठी नाबाद 227 धावांची खेळी केली होती. त्यावेळच्या स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या होती. आता पृथ्वी शॉने नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना 50 व्या षटकात 152 चेंडूत 28 चौकार आणि 11 षटकारांसह 244 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉच्या खेळीमुळे नॉर्थहॅम्प्टनशायरला वन डे चषकात त्यांची दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारण्यास मदत झाली. नॉर्थहॅम्प्टनशायरने 50 षटकांत 8 गडी गमावून 415 धावा केल्या.

पृथ्वी शॉने आतापर्यंत 56 लिस्ट ए सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 50 पेक्षा जास्त सरासरीने 2900 हून अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 20 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या. पृथ्वी शॉने गेल्या आठवड्यात पदार्पणाच्या सामन्यात ग्लॉस्टरशायरविरुद्ध 34 धावांवर बाद झाला होात.

हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त

पृथ्वी शॉने तयार केलेल्या रेकॉर्डची यादी
– पृथ्वी शॉने त्याची सर्वोच्च धावसंख्या (244 धावा) केली. एकदिवसीय चषकात द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ तिसरा फलंदाज ठरला.
– पृथ्वी शॉच्या नावावर वनडे चषकात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे. त्याने ऑली रॉबिन्सनचा 206 विक्रम मागे टाकला.
– पृथ्वी शॉ लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाउंड्री (39 बाउंड्री (28 चौकार, 11 षटकार)) मारणारा तिसरा फलंदाज ठरला.

– पृथ्वी शॉची 244 ही इंग्लिश लिस्ट ए क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. अली ब्राऊन पहिल्या क्रमांकावर आहे. अली ब्राउनने 2002 मध्ये 268 धावा केल्या होत्या.
– रोहित शर्मानंतर लिस्ट ए मध्ये सर्वाधिक द्विशतके करणारा पृथ्वी शॉ हा दुसरा भारतीय आणि एकूण चौथा आहे. रोहित शर्माने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 3 द्विशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर अली ब्राउन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी 2-2 वेळा द्विशतके झळकावली आहेत.
– पृथ्वी शॉने एकदिवसीय चषकात चेतेश्वर पुजाराचा भारतीयाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला.
– पृथ्वी शॉने भारताच्या सौरव गांगुलीच्या 183 (श्रीलंकेविरुद्ध 1999 मध्ये) इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वाधिक लिस्ट ए स्कोअर म्हणून मागे टाकले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube