महावितरणकडून वीजपुरवठा खंडित! आमदार पवारांचा थेट देवेंद्र फडणवीसांनाच फोन…

महावितरणकडून वीजपुरवठा खंडित! आमदार पवारांचा थेट देवेंद्र फडणवीसांनाच फोन…

महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत असल्याने आमदार अभिमन्यू पवार यांनी महावितरण बैठकीतून उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत व्यथा मांडली. त्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवणार असल्याचा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात कोरडा दुष्काळ पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तोंडाला आलेला घास जाऊ नये, म्हणून शेतकऱ्यांकडून विहिरीतील पाणी पिकांना देण्यात येत आहे, मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असल्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हा मुद्दा आमदार अभिमन्यू पवारांकडे मांडताच पवारांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच फोन करुन शेतकऱ्यांची व्यथा मांडली. देवेंद्र फडणवीसांनीही दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड दम भरल्याचं दिसून आलं आहे.

गौतम अदानींचे संबंध, भेटीगाठी अन् पुरस्कार; भाजपने फोटो शेअर करुन गांधींना विचारले सवाल

लातूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याचा फटक सर्वच नागरिकांना बसत आहे. पुरेसं पाणी मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे. तर तोंडाला आलेल्या पिकांना शेतकरी आपल्या विहिरीचं पाणी देऊन जगवतं आहेत. शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या असतानाच महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आमदार पवार यांची भेट घेत व्यथा मांडली.

Megha Dhade: बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक’ पदी नियुक्ती; म्हणाली…

आमदार पवारांनी दखल घेत शेतकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन केला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, महावितरणकडून शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा घरी पाठवू, असा इशाराच त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube