गौतम अदानींचे संबंध, भेटीगाठी अन् पुरस्कार; भाजपने फोटो शेअर करुन गांधींना विचारले सवाल

गौतम अदानींचे संबंध, भेटीगाठी अन् पुरस्कार; भाजपने फोटो शेअर करुन गांधींना विचारले सवाल

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असल्याचं दिसून येत आहे. इंडियाची आज मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतमी अदानींच्या गैरव्यवहारांची यादीच मांडली आहे. त्यावरुन आता भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली आहे. भाजपनेही ट्विट करीत गौतमी अदानींचे संबंध, भेटीगाठी आणि पुरस्कारावरुन राहुल गांधींना सवाल विचारले आहेत.

भाजपने ट्विटमध्ये म्हटलं, “राहुल यांचे जिजाजी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रॉ आणि उद्योगपती अदानी यांचे संबंध काय? ते कोणत्या प्रकल्पावर काम करत आहेत? ममता बॅनर्जी आणि उद्योगपती अदानी एकमेकांना का भेटले? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत,गौतम अदानी सोबत काय करत आहेत? शरद पवारांचे आणि उद्योगपती अदानी यांचे काय संबंध आहेत? का वारंवार गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला जातात? हिडनबर्ग रिपोर्ट संदर्भात JPC शिफारस शरद पवारांनी का फेटाळून लावली? हे शरद पवारांना कधी विचारलं का? 2013 मध्ये महाराष्ट्रातील तिरोडा येथील 660 मेगावॅटचा थर्मल पावर प्लांट तत्कालीन काँग्रेस सरकारने अदानीला का दिला?बालबुद्धी राहुल गांधींनी सांगावे, याच मुंबईतील अदानी समुहाला मुंबईतील मोक्याच्या ठिकाणचे भूखंड काँग्रेसने का दिले?” असे सवाल भाजपकडून राहुल गांधींना विचारण्यात आले आहेत.

ESIC Recruitment : कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू, थेट मुलाखतींच्या फेरीतून होणार निवड

“अदानी समूहाला 2014 पूर्वी काँग्रेस सरकार कडून कोणकोणते पुरस्कार दिले आहेत हे जनतेला कळलं पाहिजे. काँग्रेसच्या मनमोहनसिंग सरकारने आदणीला समुहाला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. 2010-11 साठी मनमोहनसिंग सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडून औष्णिक ऊर्जा प्रकल्प – युनिट-1 त्वरित पूर्ण केल्याबद्दल गोल्ड शील्ड पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2013, ऊर्जा मंत्रालय, मनमोहनसिंग सरकार कडून देण्यात आला. 2013 मध्ये याच काँग्रेसच्या कर्नाटकमधील सिद्धरमैय्या सरकारने सर्वश्रेष्ठ सुरक्षित पॉवर बॉयलर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार याच काँग्रेसने अदानी समूहाला दिलेले आहेत. ज्या व्यक्तीला NCC चा फुलफॉर्म माहिती नाही, तो व्यक्ती देशाच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, बेरोजगारीबद्दल ज्ञान पाजळतो. ज्या व्यक्तीला देशाचं 52 सेकंदाचे राष्ट्रगीत समजून घ्यायला 28 सेकंद लागतात तो व्यक्ती आज वाट्टेल तसे आरोप करत आहे” अशीही टीका ट्विटमध्ये करण्यात आली आहे.

मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला; नागरिकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न

राहुल गांधी काय म्हणाले?
अदानींनी भारतातला पैसा परदेशात नेला आणि पुन्हा भारतात आणला आहे, अदानींच्या माध्यमातून भारताबाहेर गेलेला पैसा कुणाचा? भारतातून जवळपास 1 बिलियन डॉलर अदानींच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशात पाठवण्यात आले असून त्या पैशांतूनच अदानी एअरपोर्ट, धारावीसारखे प्रकल्प घेत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून भाजपला पराभूत करण्यासाठी रस्सीखेच सुरु असून त्यासाठीच इंडिया देशभरात बैठका घेत असल्याचं दिसून येत आहे. बैठकीनंतर इंडियाचे नेत्यांकडून भाजपसह मोदींना टार्गेट करण्यात येत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडूनही विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता भाजपने विचारलेल्या सवालांवर राहुल गांधी काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube