Honor Killing: मृत अमितच्या चुलत मेव्हण्याच्या आवळल्या मुसक्या, सासरा अद्याप फरार…
Sambhajinagar Honor Killing : छत्रपती संभाजीनगर येथे 14 जुलै रोजी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या (Honor Killing)रागातून मुलीच्या वडिलांनी आणि चुलत भावाने जावयावर गंभीर हल्ला केला. इंदिरानगरमध्ये घडलेल्या या घटनेत अमित मुरलीधर साळुंके (Amit Muralidhar Salunke) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालात दाखल करण्यात आले होते. मात्र, मात्र, शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी उपायुक्तांच्या विशेष पथकाने चुलत मेव्हणा अप्पासाहेब कीर्तीशाही (Appasaheb Kirtishahi) याला हर्सूल परिसरातून अटक केली आहे. तर सासऱ्याचा शोध सुरू आहे.
अमित मुरलीधर साळुंकेंवर सासऱ्याने आणि मेव्हण्याने हल्ला केल्यानंतर सासरा गीताराम भास्कर कीर्तिशाही आणि चुलत मेव्हणा अप्पासाहेब अशोक कीर्तीशाही पसार होते. दरम्यान, मेव्हण्याच्या लोकेशनची उपायुक्त नितीन बगाटे यांच्या विशेष पथकाला माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक विशाल खटके, जमादार शशिकांत सोनवणे आणि विशाल पाटील यांनी शनिवारी दुपारी हर्सूल परिसरातील मयुरी लॉनसमोर सापळा रचला. तेथे अप्पासाहेब कीर्तीशाही येताच त्याच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्या अटकेची क्रांतीचौक पोलिस ठाण्यात नोंद करून जवाहरनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
Paris Olympics 2024 मध्ये लक्ष्य सेनची धमाकेदार सुरुवात, केविन कॉर्डेनचा केला पराभव
नेमकं प्रकरण काय?
अमितचे त्याची बालपणी विद्याशी प्रेमसंबंध होते. पण दोघांचे धर्म भिन्न असल्याने त्यांच्या लग्नाला विद्याच्या घरच्यांचा विरोध होता. हा विरोध झुगारून त्यांनी पळून जाऊन एप्रिल महिन्यात लग्न केले. दरम्यान, अमितच्या घरच्यांनी त्यांना स्विकारलं. घरी आल्यानंतर त्यांचा सुखाचा संसार चालला होता. मात्र, मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने विद्याच्या वडिलांचा संताप अनावर झाला. त्यांनी व विद्याचा चुलत भाऊ याच्याशी मिळून 14 जुलै रोजी अमितवर भर रस्त्यात चाकून भोसकले. अमितला घाटी रुग्णायात उपचारासाठी दाखल केले. मात्र, शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.
मृत अमितच्या आईने फोडला टाहो…
छाया साळुंके म्हणाल्या, विद्या आणि अमितने प्रेमसंबंधातून लग्न केलं. त्यांच्या लग्नाला दोन महिने झाले होते. त्यानंतर आम्ही त्यांना घरी बोलावून त्यांचं रितसर लग्न लावून दिलं. त्यांचा चांगला संसार सुरू होता. मुलीच्या वडिलांना लग्न करून द्यायचं नव्हतं तर आधीच आपली मुलगी घेऊन जायची होती. माझ्या मुलाला मारण्याचा त्यांना काय अधिकार आहे,माझ्या लेकराने कोणता गुन्हा केला, प्रेमंच केलं ना असा उद्विग्न सवाल अमितच्या आईने केला.
माझ्या मुलाच्या अंगावर आठ वार होते. माझ्या मुलाचा जीव घेणाऱ्यांना फासावर चढवून मला न्याय भेटलाच पाहिजे, अशी मागणी मृत अमितच्या आईने केली.