पेपरफुटी थांबेना! बार्टी, सारथीनंतर आता पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटला; बीडमध्ये एकाला अटक

  • Written By: Published:
पेपरफुटी थांबेना! बार्टी, सारथीनंतर आता पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटला; बीडमध्ये एकाला अटक

Paper Leak in Beed : राज्यात काही दिवसांपूर्वीच तलाठी आणि त्यानंतर बार्टी, सारथी आणि महाज्योतीचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दिवसेंदिवस पेपरफुटीच्या (Paper Leak ) घटना वाढत आहे. पेपरफुटीच्या घटना थांबत नसल्याने उमदेवारांमध्ये संतापाची लाट पसरली होती. अशातच आता पुन्हा एकदा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब बीडधू (Beed) समोर आली. पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली.

हिमाचल प्रदेशमधील संकट टळले; विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा मागे 

गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षा सुरू आहेत. याच दरम्यान, पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे की, बीड शहरातील चारटा फाटा येथील स्वामी विवेकानंद कॉम्प्युटर्समध्ये पुरवठा निरीक्षक पदासाठी परीक्षा सुरू होती. ही परीक्षा देताना ब्लूटूथ आणि कॉपी करण्यासाठी लागणारे व्हॉकीटॉकी ही पकडण्यात आलेल्या आरोपीकडे असल्याटी माहिती एमपीएससीचे समन्वयक राहुल कवठेकर यांनी दिली आहे.

Maratha Reservation : मराठ्यांनो निवडणुकीच्या मैदानात उतरा; प्रकाश आंबेडकरांची नवी खेळी 

बीडमधील लहू मच्छिंद्र काळे असं पकडलेल्या सराईत पेपरफुटी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे कोतवाल भरती, पिंपरी चिंचवड पोलीस भरती, मुंबई पोलीस भरती यामध्ये देखील लहू काळे या पेपरफुटी करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पेपर फुटी झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी परीक्षा केंद्रावर आणि बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अलीकडचे झारखंड सरकारने पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नवीन विधेयक आणलं. या कायद्यात पेपर फुटल्यास किमान 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंत आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडापर्यंतची कडक तरतुद आहे. याच धर्तीवर राज्य सरकारनेही कडक कायद्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आता परीक्षार्थी करू लागले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube