Marathwada Teachers’ Constituency Election : सूर्यकांत विश्वासरावांनी आणली चुरस

Marathwada Teachers’ Constituency Election : सूर्यकांत विश्वासरावांनी आणली चुरस

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. विक्रम काळेंना पहिल्या पसंतीची 20 हजार 78 मते मिळाले आहेत. तर याच मतदारसंघातील भाजपचे उमदेवार किरण पाटील (Kiran Patil) यांना 13 हजार 489 मते मिळाल्याची माहिती समोर आलीय. अत्यंत चुरशीची मानली जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालावरुन विक्रम काळे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याची चर्चा रंगलीय.

दुसरीककडे काळे आणि किरण पाटलांपाठोपाठ मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासरावांना अधिक मताधिक्य मिळाल्याचं समोर आलंय. सूर्यकांत विश्वासराव यांना 13 हजार 543 मते मिळाली आहेत. सूर्यकांत विश्वासराव (Suryakant Vishwalrao) यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाल्याने प्रतिस्पर्धी असलेले प्रमुख उमेदवार किरण पाटील आणि विक्रम काळेंना त्यांनी मोठा धक्का दिला आहे.

गेल्या महिनाभरापासून विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. 30 जानेवारी रोजी राज्यातील पाचही विभागांचं मतदान पार पडलंय. अखेर या पाचही मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीस आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालीय.

मतमोजणीच्या सुरवातीला मतपेट्या उघडून मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर मतांचे २५-२५ चे गठ्ठे करुन मोजणीसाठी ५६ टेबलवर प्रत्येकी ४० गठ्ठे देण्यात आले. दुपारी १२ वाजेपासून वैध-अवैध मतांचे वर्गीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली.

निवडणुक प्रतिनिधी-मतमोजणी अधिकाऱ्यांमध्ये वाद :
मतमोजणी अधिकाऱ्यांकडून मतमोजणी सुरु असतानाच भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचे निवडणुक प्रतिनिधी शिवाजी दांडगे यांना एका संशायस्पद मतपत्रिकेवर आक्षेप घेतला. या संशयास्पद मतपत्रिकेवर वेगळी खूण करण्यात आल्याने दांडगे यांनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आलीय. यावेळी शिवाजी दांडगे आणि मतमोजणी अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर विभागीय आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला आहे. हा वाद सुरु असताना मतमोजणीच्या ठिकाणी काही तणावाचं निर्माण झालं होतं.

दरम्यान, एकीकडे किरण पाटील आणि विक्रम काळे यांच्यात मुख्य लढत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मतमोजणीनंतर सुर्यकांत विश्वासराव यांना अधिकचे मतं मिळाल्याने मराठवाड्यात एकच खळबळ उडालीय. अखेर दुरंगी होणारी लढत आता तिरंगी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube