बीडच्या आष्टीत बांधकाम विभागाचा तुघलकी कारभार; अतिक्रमण सांगून 21 गाळे पाडले, मेहबुब शेख आक्रमक

प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांनी २१ गाळे हे पाडले वास्तविक पाहता सदरील गाळेधारकाकडे मालकी हक्काचे कागद पत्र आहेत.

News Photo   2026 05 18T151559.984

आष्टी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईत २१ गाळे पाडण्यात आल्याने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. (Ashti) प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांनी कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केल्याचा आरोप गाळेधारक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित गाळेधारकांकडे मालकी हक्काची कागदपत्रे असतानाही प्रशासनाने त्यांची बाजू न ऐकता थेट बुलडोझर चालविल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडून संबंधित गाळे अतिक्रमण असल्याचा दावा केला जात असला तरी कायद्यानुसार नोटीस देणे, सुनावणीची संधी देणे आणि त्यानंतरच कारवाई करणे आवश्यक असताना या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते महेबुब शेख काय म्हणाले?

आष्टी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांनी २१ गाळे हे पाडले वास्तविक पाहता सदरील गाळेधारकाकडे मालकी हक्काचे कागद पत्र आहेत. ते अतिक्रमण नाही असं असताना साधी नोटीस न देता गाळ्या पाडण्याचे घाट का? अतिक्रमण असंल तरी कायद्याने त्यांना नोटीस देणे बंदनकारक असतना नोटीस न देता त्यांची बाजू न ऐकता पानसंबळ यांनी पोलीस सरक्षंण घेऊन ही कारवाई केली .

जिल्हाधिकारी यांनी सांगीतलं असताना त्या लोकांना संधी द्या मोजणी करा ह्या गोष्टीला फाट्यावर मारत पानसंबळ यांनी कार्यवाही केली ऐक अभियंता हा जिल्हाधिकारी आणी नियमाला न जुमनता नेमक काम कस काय करु शकतो असा प्रश्नही शेख यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक विकास काम करायचं असेल आणि जर कुणाची जागा लागणार तर त्याला शासनाने काही नियम घालून दिले आहेत त्यानुसार त्यांना नोटीस देणे मालकी हक्काची जागा असेल तर त्यांना जमीनीचे कमतीपेक्षा जास्त भाव देऊन जमीन संपादीत करणं अस असताना पासंबळ यांच्या मनाचा तुगलकी कारभार आष्टी विभागमध्ये चालला आहे असा थेट आरोपही शेख यांनी केला आहे.

follow us