वैद्यनाथ कारखाना निवडणुकीत मुंडे बहिण-भाऊ एकत्र येणार?; ‘यांनी’ केला उमेदवारी अर्ज दाखल

वैद्यनाथ कारखाना निवडणुकीत मुंडे बहिण-भाऊ एकत्र येणार?; ‘यांनी’ केला उमेदवारी अर्ज दाखल

Vaidyanath Cooperative Sugar Factory Election : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. कधी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणून तर कधी राज्यातील ओबीसींचे नेते म्हणून हे दोन्ही नेते नेहमीच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले आहे. मात्र, आगामी काळात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकत्र येणार असल्याची शक्यता बोलल्या जाते. कारण, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Vaidyanath Cooperative Sugar Factory) संचालकपदाची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

काही दिवसांपूर्वी परळीस्थित जवाहर शिक्षा संस्थेच्या निवडणुकीत मुंडे बंधू-भगिनींचा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी तो टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. 21 संचालकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 50 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे कारखाना निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी अर्जच भरलेला नाही. तर पंकजा मुंडे यांनी स्वत:सह आई आणि दोन्ही बहिणींचा अर्ज दाखल केला आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडून अजय मुंडे यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहीण-भावात चुरस पाहायला मिळेल, असं चित्र वर्तवले जात असले तरी संघर्ष टाळून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोघांनीही प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे.

अल्पवयीन मुलं केक कापतानाच पोलिसांनी त्यांना ‘धू धू धुतले’… पुण्यात घडला प्रकार

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी उभारलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ या निवडणुकीत एकत्र येणार आहेत.

अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गोपीनाथगड येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 21 जागांसाठी एकूण 50 अर्ज दाखल झाले. भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे, प्रज्ञा मुंडे, अजय मुंडे यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

गोपीनाथगड येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना युती सरकारच्या काळात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली होती. तेव्हापासून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मुंडे आणि नंतर त्यांच्या नंतर त्यांच्या कन्या – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व राहिलेले आहे.

उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार असून 1 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 11 जून रोजी मतदान होणार असून 12 जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र कारखाना निवडणुकीत स्वत: किंवा कुटुंबातील एकाही व्यक्तीचा अर्ज दाखल केलेला नाही. केवळ अजय मुंडे यांचा त्यांच्या गटातून परिवारीतील उमेदवारी अर्ज आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत 1 जून असल्याने या काळात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube