भरणेंच्या मदतीला भुजबळ! कृषिमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा भुजबळांनी सांगितला नेमका अर्थ

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याचा आपण चुकीचा अर्थ घेतो असं माझं म्हणणं आहे.

Chhagan Bhujbal And Dattatreya Bharane

Chhagan Bhujbal on Dattatreya Bharane Statement : वादग्रस्त वक्तव्य करणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचं कृषी खातं काढून मंत्री दत्तामामा भरणे यांना देण्यात आलं. खात्याची जबाबदारी हाती घेताच भरणे मामांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं. एका कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करुन परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. यानंतर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भरणे यांच्या वक्तव्याचा अर्थ सांगितला आहे.

मंत्री भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कृषिमंत्री भरणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, की वक्तव्याचा आपण चुकीचा अर्थ घेतो असं माझं म्हणणं आहे. मंत्र्यांकडे लोक केव्हा येतात? काही अडचणी असतील तेव्हाच येतात. अधिकाऱ्यांकडे न्याय मिळत तेव्हाच मंत्र्यांकडे लोक येतात. कधी कधी उगाचच नियमांचा किस काढला जातो. त्यामुळे काही काम होत नाही. आपण जर लोकांची कामं केली तर लोक आठवणी ठेवतात असं त्यांना म्हणायचं असेल. प्रत्येक वेळी तुम्ही एका अर्थाचा दुसरा अर्थ घेत जाऊ नका. कधी कधी अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण होतात तेव्हा त्या निर्णयात मंत्री, वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊन काम मार्गी लावतात.

भाजपचं भ्रष्टाचारी तेतुका मेळवावा, कुणालाही मंत्री महोदय म्हणावं लागतं; ठाकरेंचा राणेंना टोला

follow us