भाजपचं भ्रष्टाचारी तेतुका मेळवावा, कुणालाही मंत्री महोदय म्हणावं लागतं; ठाकरेंचा राणेंना टोला

Udhhav Thakeray Criticize BJP and Nitesh Rane for Metro 3 project affected Koli Bandhav : कोळी बांधव आणि मेट्रो 3 प्रकल्प बाधित असलेले लोकांची आज शिवालय इथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सचिन आहीर आणि अरविंद सावंत देखील या बैठकीसाठी उपस्थित होते. ससून डॉक येथील मासे विक्री करणारे कोळी बांधव होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेत भाजपवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मेट्रो 3 प्रकल्पातून कोळी बांधवांच्या जागांवर सरकार कब्जा करत आहे. त्यांना घोषणा केल्या की चांगले वाटते. पण पूर्ण विजय मिळालेला नाही.ही सरकारची चाल असते. पिल्लू सोडतात,पण ते वेळ घेतात आणि आपल्याला जिंकलो वाटत आपण तो प्रश्न विधान परिषदेत मांडला.
मराठवाड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार; वाचा, हवामान विभागाने काय दिला अंदाज?
तसेच मत्ससंवर्धन आणि बंदरे हे खातं सांभाळत असलेल्या नितेश राणेंना ठाकरेंनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, कोणाला मंत्री महोदय बोलण्याची वेळ येईल माहीत नाही. मुलाला बापाने विचारले तेव्हा तो भाजप मध्ये जाणार म्हणाला तेव्हा बापाने इतर पक्षात जाऊन घोटाळे कर सांगितले. नाही तर उपर्यांचे सतरंज्या उचलायचं लागतील. कोळ्यांचा वास येतो मताला वास येत नाही मंत्र्यांच्या वयाच्या किती तरी जुनी सासून डॉक आहे.
एआयमुळे रोजगार संकटात! अनसेफ अन् सेफ नोकऱ्यांची यादी मिळाली; मायक्रोसॉफ्टचा अहवाल
मी मंत्री असताना अनेक वादळे आली तेव्हा मच्छीमार किती आत आहेत विचारायचो. एकजूट मजबूत ठेवा , मच्छि का पाणी मराठी माणसाचे पाणी पाजायचे. कोळी महिला चिडल्यावर काय करते अजिबात घाबरायचे नाही. पहिला टप्पा जिंकला पण दुसऱ्याची तयारी करीत असेल तर संपवून टाकू. आम्ही हिंदू आहोत मराठी बोलणार हिंदू आहोत आम्हाला खाऱ्या पाण्याची सवय आहे आमच्या सुखात मीठ कालवू नका.आम्ही सगळे सोबत आहोत , एकत्र रहा, अन्याय करायला येईल त्या अन्यायाला तोडून टाका.
दंगल आणि आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवा, मंत्री नितेश राणेंचा पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
आपले सरकार आले असते तर तुमच्यावर वेळ आली नसती. शिवसेनेचे स्थापना भूमी पुत्रांसाठी झाली होती आपल्या परंपरा आपण सांभाळतो नारळी पोर्णिमा सण आहे पुढे. सरकार महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघाले आहे. भाजपचे काय चालले आहे? भ्रष्टाचारी तेतुका मेळाववा भाजप पक्ष वाढवावा असं भाजपचं धोरण आहे.