‘पवारांनी संधी दिली’ म्हणणाऱ्यांना हसन मुश्रीफांच खोचक प्रत्युत्तर, म्हणाले, ‘विरोध..,’
Hasan Musrif Vs Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ‘साहेबांचा संदेश’ कार्यक्रमांतर्गत राज्यभर दौरा करीत आहेत. कोल्हापुरातून त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेनंतर आता हसन मुश्रीफांनीही आक्रमक पवित्रा घेत रोहित पवारांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
कधी विषबाधा, कोण खिडकीतून पडले तर कोणाला गोळ्या घातल्या… गुढरित्या संपले पुतीन यांचे टीकाकार
हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात सहा आमदार होते आता कमी झाले आहेत. पुण्यात देखील अशी परिस्थीती झाली आहे. आरोप करायला जागा नसल्याने रोहित पवार बारके आरोप करीत असून मला 1998 मध्ये कुणाचा विरोध होता हे त्यांनी जाहीरपणे सांगावे, त्यावेळी मंडलिक साहेब तर माझ्याच सोबत होते, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
तसेच रोहित पवार राजकारणात नवखे असून त्यांना शरद पवार गटात अजित पवारांची जागा घ्यायची असल्याचा गौप्यस्फोटही हसन मुश्रीफ यांनी केला आहे. रोहित पवार याचसाठी एवढे धाडस करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Zika virus : मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर , काय आहेत लक्षणं?
काय म्हणाले होते रोहित पवार?
1998 मध्ये हसन मुश्रीफ यांना संधी देवू नये, असा अनेक नेत्यांचा आग्रह होता. पण शरद पवार यांनी हा विरोध डावलून हसन मुश्रीफ यांना संधी दिली. पण आता एमआयडीसीमध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांसोबत छोटेखानी सभा घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वाभिमान सभेची सुरुवात बीडमधून केली आहे. आता येत्या 25 ऑगस्टला राष्ट्रवादीची कोल्हापुरात सभा होणार आहे. या सभेवरुनही हसन मुश्रीफ यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. ही सभा दसरा चौकात होणार असून साहेबांना एवढ्या छोट्या मैदानात आणायला नको होते. त्या मैदानात पाच हजार लोक बसू शकतील. त्यांच्या सभेला गर्दी व्हावी याच आमच्या शुभेच्छा असल्याचंही ते म्हणाले आहेत.