गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात नका आणू! ठाकरे गटाच्या आमदाराचं सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना पत्र
Kailash Patil letter to CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोयाबीन खरेदीबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा करत ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी फडणवीसांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. (Kailash Patil) शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका, ही आपणास विनंती.. असं ट्विट करत त्यांनी सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावलेत.
‘मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांना लागून आहे. मात्र, आपणही पुन्हा तोच कित्ता गिरवत आहात, असं दिसतं.’ असंही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत केलं.
सोयाबीन विक्री नोंदणीसाठी मुदतवाढ; शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, राणाजगजितसिंह पाटलांचं आवाहन
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात महाविकास आघाडीकडून सोयाबीनचा हमीभावाचा, सोयाबीन खरेदीचा मुद्दा आक्रमकपणे उचलला गेला होता. दरम्यान, मुख्यमंत्री पदावर घेताच धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सोयाबीन खरेदीवरून खरमरीत ट्विट केलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.
काय आहे ट्विट ?
सन्माननीय देवेंद्रजी,
आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालात याबद्दल प्रथमत: आपले मनःपूर्वक अभिनंदन! मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांना लागून आहे. मात्र, आपणही पुन्हा तोच कित्ता गिरवत आहात, असे दिसते. आपण आजच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोयाबीन खरेदीचा मुद्दा सांगितला. आर्द्रतेचा निकष १२ टक्के होता. तो शेतकरी हित लक्षात घेऊन वाढवला व १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीनही हमीभाव केंद्रावरून विकत घेत आहात व त्यामुळे विक्रमी खरेदी झाल्याचे आपण म्हटले आहे. पण, त्याची एकदा पडताळणी करायला हवी होती. केंद्रावरील वास्तव आपण म्हणता त्यापेक्षा वेगळे आहे.
धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील एकाही हमीभाव केंद्रावरून १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीन खरेदी केले गेले नाही, आजही करीत नाहीत. आपण स्वतः काही केंद्रांना भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. त्यामुळे हे वास्तव आपणास अवगत करून देणे आवश्यक वाटते. नव्या सरकारची सुरुवातच अशा थापानी होणार असेल तर पुढे शेतकऱ्यांनी आपल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला.. शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका, ही आपणास विनंती.. असं ट्विट त्यांनी केलंय.
सन्माननीय देवेंद्रजी,
आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालात याबद्दल प्रथमत: आपले मनःपूर्वक अभिनंदन!मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय… pic.twitter.com/3ursavZmOL
— Kailas Patil (@PatilKailasB) December 6, 2024