युवा पिढीला एनर्जी ड्रिंक्सच्या विळख्यातून वाचवा, सत्यजीत तांबेंची सरकारकडे कळकळीची विनंती
Satyajit Tambe : राज्य सरकारने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र (Drug-free Maharashtra) मोहीम हाती घेतली असताना किराणा माल आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिंक (Energy drink) हे एखाद्या ड्रग्ज येवढेच घातक आहे. त्यामुळे शाळा परिसरात कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी घालून योग्य कार्यवाही करावी,अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्याकडे केली आहे.
iPhone आणि Android वर वेगवेगळे दर का? उबर, ओलाला केंद्र सरकारची नोटीस
तसेच याबाबत संबधित अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेण्यात यावी, असंही तांबे यांनी म्हटलं. त्यानुसार मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंगळवारी तातडीने बैठकीचे आयोजन केले आहे.
जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री असल्याने शाळेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहे. तरुण वर्गासोबतच लहान मुले देखील याकडे आकर्षित होत आहेत. शाळा व महाविद्यालय परिसरात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
सायंकाळी 7.59 वाजताचे रहस्य उलगडले, स्टार प्लसवरील ‘जादू तेरी नजर’ मालिकेची पहिली झलक दिसली
घोषणा करूनही अद्याप कारवाई नाही
राज्यामध्ये शाळा परिसरातील कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी जुलैच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. आमदार सत्यजीत तांबेंनी मांडलेल्या मुद्यावर तत्कालीन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शाळा परिसरात ५०० मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे जाहीर केले होते. मात्र अद्याप कोणतीही कारवाई नाही.
एनर्जी ड्रिंक्समुळे होणारे दुष्परिणाम कोणते?
-एनर्जी ड्रिंक्समध्ये वापरण्यात येणारे कॅफेन शरीराला अत्यंत घातक आहे.
-कॅफेनचे जास्त सेवन केल्यामुळे नशा येऊन मेंदू, किडनी, मज्जारज्जू यावर विपरीत परिणाम होतो.
-अस्वस्थता, निद्रानाश, प्रजनन समस्या, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि चिडचिडेपणा या व्याधींचा धोका निर्माण होतो.