ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका; LPG सिलिंडर महागलं, काय आहे नवा दर?

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका; LPG सिलिंडर महागलं, काय आहे नवा दर?

LPG Cylinder Price :  मोदी सरकारने अर्थसंकल्प नुकताच सादर केल्या त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच महागाईचा झटका दिला आहे. आज, 1 ऑगस्ट 2024 रोजी, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. (Cylinder) बजेट नंतर ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केले आहेत. परंतु, 14 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मात्र तशाच आहेत. (Modi) आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली आहे.

Video: उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; देवेंद्र फडणवीसांवरील टिकेवरून विखेंचा हल्लाबोल

काय आहेत नवे दर?

IOCLच्या वेबसाइटनुसार, दिल्ली ते मुंबई या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झाल्या आहेत. ताज्या बदलानुसार, दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1646 रुपयांवरून 1652.50 रुपये झाली आहे, ज्यामध्ये प्रति सिलिंडर 6.50 रुपयांची वाढ झाली आहे.

एका रात्रीच होत्याचं नव्हत झालं; वायनाडमध्ये मृतांचा आकडा 254, तर 300 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज

कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली आहे, ज्यामुळे ती किंमत 1756 रुपयांवरून 1764.50 रुपये झाली आहे. मुंबईमध्ये सिलिंडरची किंमत 7 रुपयांनी वाढून 1598 रुपयांवरून 1605 रुपये झाली आहे. चेन्नईमध्येही सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून, ती किंमत 1809.50 रुपयांवरून 1817 रुपये झाली आहे.

जुलैमध्ये झाली होती कपात

जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती. दिल्लीत 19 किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती, त्यामुळे ती किंमत 1676 रुपयांवरून 1646 रुपये झाली होती. कोलकातामध्ये ती किंमत 1787 रुपयांवरून 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1840.50 रुपयांवरून 1809.50 रुपये आणि मुंबईमध्ये 1629 रुपयांवरून 1598 रुपये झाली होती.

घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत असताना, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मात्र स्थिर आहेत. महिला दिवसाच्या निमित्ताने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी केल्या होत्या. सध्या दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईमध्ये 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube