MPSC Protest : पाठिंबा द्यायला आलो माझं चुकलं का..? MPSC आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकरांना विरोध

MPSC Protest : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून एमपीएससी अध्यक्ष विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांच्या राजीनाम्या मागणीसाठी

MPSC Protest

MPSC Protest : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून एमपीएससी अध्यक्ष विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांच्या राजीनाम्या मागणीसाठी एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक नेते पोहोचले आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचले होते मात्र त्यांच्याविरोधात आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली.

ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी विद्यार्थ्यांसोबत (MPSC Protest) संवाद साधताना म्हटले की, तुमची परीक्षा आयुष्यभरासाठी आहे, आमची निवडणूक 5 वर्षापुरती आहे. आमच्यापेक्षा तुमच्या यातना खुप जास्त आहेत. मला तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य आहेत. सर्वसामन्य मानसाच्यासोबत जसा मझा कनेक्ट आहे तसाच आहे. मात्र यावेळी शिंदे साहेबांना फोन लावून विवेक भीमनवार यांचा राजीनाा मागा अश्या घोषणा विद्यार्थ्यांकडून सुरु होत्या.

पुढे बोलताना खासदार निंबाळकर यांनी तुम्हाला पाठिंबा द्याला आलो माझं चुकलं का? असा सवाल केला. तुमची भावना 100 टक्के सरकारपर्यंत पोहचवेल अशी ग्वाही देखील यावेळी खासदार निंबाळकर यांनी दिली. तसेच एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा कोणाला घेता योते असं देखील प्रश्न त्यांनी या विचारला. तर दुसरीकडे त्यांच्या भाषणादरम्यान काही विद्यार्थी गो बॅक चे नारे देखील लावत होते.

महायुतीत वाद, भाजपचा मोठा निर्णय, सत्तेतून बाहेर पडणार

follow us