मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई आणि सोलापूरकरांच्या पसंतीस उतरलेली मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे.
प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या या वंदे भारतला (Vande Bharat) आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात झाला. मुंबईवरुन सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेचा कोच नं सी 15 रुळावरून घसरला. पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 3 वर ट्रेन येत असताना हा अपघात झाला.
या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मुंबई आणि सोलापूरकरांच्या पसंतीस उतरलेली मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने या ट्रेनेने प्रवासी प्रवास करतात.
प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या या वंदे भारतला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात झाला. मुंबईवरुन सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेचा कोच नं सी 15 रुळावरून घसरला.पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 3 वर ट्रेन येत असताना हा अपघात झाला, त्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
पक्षासाठी त्यांनी काय केलं ? गोऱ्हे यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीला महिला आघाडीचा उघड विरोध
ट्रेन नंबर 22225 मुंबई ते सोलापूर Vande Bharat Express ही गाडी पुणे स्थानकात सायंकाळी सुमारे 7.30 वाजता प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करत असताना डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला. पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत या क्रॉसिंगच्या उन्नतीकरणाचे काम नियोजित आहे, तेव्हा ट्रेनला किरकोळ अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
वंदे भारत ट्रेनमधील सी 15 या कोचमधील सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दुसऱ्या रेकमध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, वंदे भारत ट्रेनचा कोच रुळावरुन घसरल्याची ही पहिलीच घटना आहे, यापूर्वी वंदे भारत ट्रेन अचानक बंद पडल्याने दुसऱ्या इंजिनने तिला नेण्यात आलो होते.