दिशा सालियन प्रकरण : ठाकरेंच्या दोन फोनचे संभाषण सांगत राणेंनी ठेवणीतले ‘पत्ते’ उघडले

Narayan Rane on Disha Salian Case : सतीश सालियन कुटुंबाला प्रशासन, पोलीस, सहकार्य करीत नव्हते. दबाव कमी झाल्यावर सरकारकडे न जाता ते न्यायालयात गेले. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांचा करिता करविता वाजे आहे. (Salian ) त्यांच्यावर त्यावेळी दबाव होते. न्यायलय जो निर्णय देईल तो देईल. परंतु, तोपर्यंत सरकारणे एफआयआर दाखल करून अटक करायला हवी असं म्हणत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव टाकरे यांच्या किती फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे किती फेऱ्या झाल्या असा टोलही त्यांनी लगावला आहे.
खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावरच बुमरॅंग होईल; दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक
दुसऱ्या कॉलवेळीही तिच विनंती
नारायण राणे यांनी दुसऱ्या कॉलबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले, दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच नाव घेऊ नका अशी विनंती करणारा दुसरा कॉल आला होता. दुसरा फोन कोरोनाच्या काळात आला होता. त्यावेळी आपल्या हॉस्पिटलची परवानगी राज्य सरकारकडे होती. त्या संबंधित ती परवानगी मिळेल असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी आदित्यचं नाव घेऊ नका अशी पुन्हा एकदा त्यांनी विनंती केली. तुम्ही जरा या प्रकरणात सहकार्य करा असंही ते आपल्याला म्हणाल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं.
वाझे-कोरटकरवर कारवाई नाही?
आपण फक्त एक वाक्य बोलल्यानंतर पोलिसांनी आपल्याला अटक केली होती. पण आता सचिन वाझे असेल वा प्रशांत कोरटकर, या प्रकरणात पोलिस का कारवाई करत नाहीत असा प्रश्न नारायण राणे यांनी केला. दिशा सालियन प्रकरणात मुंबई पोलीस अजूनही कारवाई का करत नाहीत असा प्रश्नही त्यांनी विचारला. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरवर कारवाई का केली जात नाही? त्याला असेल तिथून शोधून काढलं पाहिजे असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
धुमाकूळ घालतात
निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली. आरोपींना अटक झाली पाहिजे हे म्हणतोय. त्यामुळे उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा. एक तर मी अमूक ठिकाणी, अमूक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही. त्यात तडजोड नाही. फक्त तुम्ही तुमच्या मुलाचं नाव घेतलं, त्याला संध्याकाळी जिथे जातो, तिथं जाण्यापासून सांभाळा. सांगा त्याला हे बरं नाही. माझ्या घराच्या समोर तो डिनो मोरिया राहतो. तिथे हे लोक जमतात आणि काय साडे तीन चार तास धुमाकूळ घालतात. पण तुम्हाला सांगणार नाही. म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा, असं नारायण राणे म्हणाले.