राष्ट्रवादीचे गटनेते शिंदे की खडसे? जयंत पाटलांची टोलेबाजी

राष्ट्रवादीचे गटनेते शिंदे की खडसे? जयंत पाटलांची टोलेबाजी

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असताना एक मोठी चूक राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उघड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत झालेली एक मोठी चूक समोर आणली आहे. राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची नियुक्ती केली आहे. पण, त्याऐवजी राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नियुक्ती केल्याचं पत्र समोर आले असल्याची माहिती नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहात दिली आहे.

“आजोबा-नातवाला मी सांगत होतो…” गोपीचंद पडळकर यांचा शरद पवार- रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, विधानपरिषदेच्या गटनेतेपदासाठी कोण असावे यासाठी मी पात्र दिले होते. तसेच मी या पदासाठी एकनाथ खडसे यांचे नाव दिले होते. १० मार्चला एक पत्रक निघाले आहे. त्यामध्ये असे म्हंटले आहे, विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदचे गटनेते व प्रतोद हे पद रिक्त असल्यामुळे आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदावर एकनाथ शिंदे यांची आणि अनिकेत तटकरे यांची प्रतोद म्हणून उपसभापतींनी नियुक्ती केली आहे.

Sheetal Mhatre : चित्रा वाघ म्हणाल्या…शीतल तू लढत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत

हे मॉर्फ केलेलं नाही आहे. मी विधिमंडळात येण्यापूर्वीही हे तपासले मात्र ही चूक अजूनही विधिमंडळाच्या वेबसाईटवर आहे. मुख्यमंत्र्यांनी तर देशाचे पंतप्रधानाच बदलले आहेत. शिंदेंनी देशाच्या पंतप्रधानपदावर द्रौपदी मुर्मू आहेत, असं जाहीर केलं आहे. त्यामुळे माझ्याकडे असणार विधिमंडळाचं गटनेते पद धोक्यात आल्यासारखं दिसायला लागलं आहे. नागालँडमध्ये मुख्यमंत्री रिओ हे सर्व पक्षांचा पाठिंबा घेत आहेत. ही नवीन पद्धत एकनाथ शिंदेंनी सुरु केली आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत, असा टोला यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी लगावला. दरम्यान हे ऐकून सभागृहात एकच हशा पिकला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube