राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादा पक्षाचे ‘बॉस’ होणार होते; शिंदेंच्या दाव्यानं नवं वळण

NCP राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल.

  • Written By: Published:
विलिनीकरणानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजितदादांकडे जाणार होते; साप्ताहिकातील दाव्यानं नवं वळण

Shashikant Shinde On Both NCP Merger :  विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता.” या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखात हा उल्लेख केला आहे. शिंदेंच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शिंदेंच्या लेखाची प्रत मागवली असून, दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदे घेऊन यावर भाष्य करणार असल्याचे सांगितले जात आहे. आता तटकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

…त्यामुळे अमित शाहांनी अजितदादांच्या अपघाताबाबत वेळ दिली नसावी; रोहित पवारांनी सांगितलं कारण

साप्ताहिकात नेमकं काय म्हणालेत शिंदे?

अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची कल्पना आणि जाणीव आहे. परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरूस्त करायची या विचाराने दादा मागील 4 ते 5 महिन्यांपासून मागे लागले होते. महापिलिका, जि.परिषदेत जाणीवपूर्वक युती घडवून आणली होती आणि दादा स्वतः हिरीरीने प्रचाराची आघाडी सांभाळीत होते. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्याचा निर्णय शरद पवारांच्या उपस्थितीत झाला होता. Shashikant Shinde On Both NCP Merger

विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णयही शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

अदृश्य शक्ती धमक्या अन्…

“अदृश्य शक्तींच्या कारवाया धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजित दादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे असल्याचेही साप्ताहिकात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अध्यक्षीय लेखात म्हटले आहे. परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचाराने दादा मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण करायचे असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, पवार साहेब आणि आमच्याशी बोलत असल्याचेही शिंदे यांनी लेखात नमुद केले आहे. अजितदादांनी पालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यासाठीच जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली होती आणि स्वतः हिरीरीने प्रचाराची आघाडी सांभाळत होते असेही शिंदेंनी लेखात म्हटलं आहे.

रोहित पवारांच्या दाव्याला हिंदुरावांचा दुजोरा; शेवटच्या क्षणी का घेतला विमान प्रवासाचा निर्णय?

पवारांच्या निवास्थानी पार पडली होती बैठक

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर एकीकडे शरद पवार गटाकडून दावा केला जात असताना, दुसरीकडे मात्र, दादांच्या राष्ट्रवादीतील नेते पवारांच्या बंगल्यावर झालेली बैठक ही जिल्हा परिषद निवडणुका आणि महापालिका एकत्रित लढवण्याबाबत झाल्याचे सांगत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता असे सांगत  खळबळजनक दावा केला आहे.

ना संपूर्ण धावपट्टी, ना यंत्रणा; बारामती विमानतळावर नियमांचे उल्लंघन

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तटकरे काय म्हणाले?

अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असताना विलिनीकरणाची घाई कोणाला झाली होती? या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नसल्याचे तटकरेंनी म्हटलं आहे. तसेच मी आधीपासून प्रश्न विचारला आहे की, राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपबरोबर येणार आहे का? आणि कोण कोणात विलीन होणार?  सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय, तसेच त्याच विधीमंडळ पक्षनेत्या असल्या पाहिजेत ही आमच्या पक्षाची भूमिका होती, त्यानुसार आम्ही काम केल्याचेही तटकरेंनी सांगितले आहे. राज्याला प्रगतीपथावर नेण्याची भूमिका दादांची होती, त्यानुसार आम्ही भाजपसोबत गेलो. मात्र, आम्ही आमची मूळ भूमिका आणि विचारधारा सोडली नाही, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

follow us