live now
Maharashtra Political Crisis Live : नारळ कुणावर तरी फोडावं लागतं, जितेंद्र आव्हाडांना अजित पवारांना टोला
Maharashtra Political Crisis Live Update : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर एकीकडे संपूर्ण राजकारण ढवळून निघालेले असताना आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका पार पडल्या. अजित पवारांनी तर आता पवार साहेबांचे वय झाले असून, आमच्या वरिष्ठांना कधी थांबले पाहिजे याचा विसर पडल्याचा इशारा दिला. दुसरीकडे पवारांनी पक्षाचं चिन्ह कुठेही जाणार नसल्याचे अजितदादांना ठामपणे ठणकावलं आहे. शरद पवार गटाकडून १९ आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. तर, अजित पवारांनी 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणुक आयोगाकडे सादर केले असून, अजितदादांच्या बंडाचे मिनिट टू मिनिट अपडेट देणारा हा लाईव्ह ब्लॉग….
LIVE NEWS & UPDATES
-
नारळ कुणावर तरी फोडावं लागतं, जितेंद्र आव्हाडांना अजित पवारांना टोला
नारळ कुणावर तरी फोडावं लागतं. माझा कुठला साखर कारखाना नाही की माझं काही बॅकग्राऊंड नाही. माझ्यामागे कुणीच नाही. मी नेहमी म्हणतो माझ्या मागे फक्त एकच ताकद आहे ती म्हणजे शरद पवार. हे कुठंतरी खटकत असावं. कारण, एवढं सगळं होऊनही मी बोलताच राहतो, त्यामुळं मला टार्गेट केलं जातं, असं वक्तव्य करत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली.
-
'पक्ष कार्यकर्त्यांनी आणि विचारसरणीने चालतो, नेत्यांनी नाही'
पक्ष हे नेते चालवत नाहीत तर कार्यकर्ते आणि विचारधारेने चालतात. पवार साहेबांनी 60 वर्षे एक विचारधारा जपली. त्याच विचारधारेने कामगार काम करत आहेत. तुम्ही तुमची विचारधारा बदलत राहिल्यास लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.
-
वयाचा फारसा फरक पडत नाही - रोहित पवार
अजितदादांनी पवारांच्या वय काढत एक प्रकारे थेट निवृत्ती घ्या असाच इशारा दिली आहे. त्यावर रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 2019 मध्ये आपण राजकारणात उतरलो आणि विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा पवार साहेब 82 वर्षांचे होते. त्यांच्यामुळेच आपल्यापैकी बहुतेकजण निवडून आले. त्यामुळे मला वय फारसे महत्त्वाचे वाटत नाही. शरद पवार जनतेत गेल्यावर जनता कोणासोबत आहे हे कळेल.
#WATCH | Sharad Pawar loyalist, NCP MLA Rohit Pawar says, "When we entered politics in 2019 and contested the Vidhan Sabha election, Pawar Saheb was 82. Most of us were elected due to him. So, I don't think age matters much."
"It is not as if existing MLAs alone are needed to… https://t.co/5SqwlHwUWM pic.twitter.com/TLPxDRJYkN
— ANI (@ANI) July 5, 2023
-
भाजप जेव्हा दोनशेवरून 300 पर्यंत जाऊ शकते तर...
शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, कार्यकर्त्यांचा हा उत्साह आगामी काळात आमचे आमदार आणि खासदार निवडून येण्यास मदत करेल असे मला वाटते. आम्ही नक्कीच जिंकू शकतो. भाजप जेव्हा दोनशेवरून 300 पर्यंत जाऊ शकते तर, आम्ही ते का करू शकत नाही.
#WATCH | "...I think this enthusiasm of workers will help our MLAs & MPs get elected in the time to come," says Sharad Pawar loyalist NCP MLC Eknath Khadse
"We can definitely win. When BJP can go from two to 300, why can't we do it?" he says when asked if they have enough… pic.twitter.com/xNknnFpDxG
— ANI (@ANI) July 5, 2023
-
पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
बंडानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या बैठकांचे सत्र आज पार पडले. पवारांच्या बैठकीपूर्वी एमएटी इन्स्टिट्यूटमध्ये अजित पवारांचे दणकेबाज भाषण झाले. यानंतर वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत पक्षाचे चिन्ह कुठेही जाणार नाही असे स्पष्ट शब्दांत ठणकावले. यानंतर भाषणाच्या शेवटी 'उषःकाल होता होता, काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली' या गाण्याच्या बोल म्हणत शरद पवारांनी या बंडाविरोधात लढण्याचा एल्गार ठोकला.
-
आम्ही सत्तेचे भुकेले नाही - पवार
पुढे बोलताना पवार म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेला 24 वर्षे झाली असली तरी ही बैठक ऐतिहासिक आहे. आज देश आपल्याकडे पाहत आहे, कार्यकर्त्यांमुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो, असे शरद पवार म्हणाले. आम्ही सत्तेचे भुकेले नाही, आम्ही सेवेच्या भावनेने पुढे जात आहोत. मी लोकांमध्ये आहे, सत्तेत नाही. मी अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे, विरोधी विचारसरणीसोबत काम करणे योग्य नाही. अजित पवारांनी न बोलता पक्ष फोडला. मी काँग्रेस सोडल्यावर माझा स्वतःचा पक्ष काढला, मी हवे असते तर काँग्रेस फोडू शकलो असतो असेही पवार यावेळी म्हणाले.
-
मला पांडूरंग म्हणायचं आणि....
मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं ते म्हणाले. विठ्ठल म्हणायचं आणि दुर्लक्ष झालं सांगायचं. अंतःकरणात पांडुरंगाचं नाव घ्यावं. बघून घेतो असं भुजबळांनी सांगितलं आणि शपथ घेतली. इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही, असं अजित पवार म्हणाले होते. आज त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत बसले. राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावायचं काम फडणवीसांनी केलं. वेगळ्या विदर्भाची मागणी फडणवीसांनी केली, शब्द पाळला नाही याची आठवणही पवारांनी यावेळी करून दिली.
-
आम्ही घड्याळ, हात, चरख्यावर लढलो
चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. आम्ही घड्याळ, हात, चरख्यावर लढलो. माझा फोटो त्यांनी वापरला. कारण त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही, असे म्हणत पक्षाचे चिन्ह आमच्याकडे आहे, ते कुठेही जाणार नाही. ज्यांनी आम्हाला सत्तेत आणले ते जनता आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत असल्याचाही पवारांनी उल्लेख केला. ज्या आमदारांनी विभाजनाचा निर्णय घेतला, त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. अजित पवार गटाने कोणतीही प्रक्रिया पाळली नसल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले.
-
पक्षाचे चिन्ह आमच्याकडेच - पवार
बंडानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नावासह चिन्ह आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर, आगामी काळातील सर्व निवडणुका या राष्ट्रवादीच्या नावावक तसेच घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. या दाव्यावर आता शरद पवारांनी मौन सोडले आहे. ते म्हणाले की, पक्षाचे चिन्ह आमच्याकडे आहे, ते कुठेही जाणार नाही. ज्यांनी आम्हाला सत्तेत आणले ते जनता आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत असल्याचाही पवारांनी उल्लेख केला. ज्या आमदारांनी विभाजनाचा निर्णय घेतला, त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. अजित पवार गटाने कोणतीही प्रक्रिया पाळली नसल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले.
The party symbol is with us, it is not going anywhere. The people and party workers who brought us to power are with us: NCP President Sharad Pawar https://t.co/IppjUVijAz pic.twitter.com/oKsaULDWIv
— ANI (@ANI) July 5, 2023
-
माझ्या बापाचा नाद करायचा नाही - सुप्रिया सुळे
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. माझा बाप माझ्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा जास्त आहे. माझ्या बापाचा नाद करायचा नाही. बाकी काहीही ऐकून घेऊन पण, बापाचा नाद करायचा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाय. बी. सेंटर येथे आयोजित सभेत अजित पवार गटाला ठणकावून सांगितले.